विद्युत प्रवाहित कुंपणाच्या स्पर्शाने मजूर ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2020 05:00 IST2020-01-21T05:00:00+5:302020-01-21T05:00:10+5:30

एकूण ११ मजूर ट्रक मध्ये ढेपीचे पोते भरत होते. दरम्यान राहूल कुंपनाशेजारी असलेल्या रांजणाजवळ पाणी पिण्यासाठी गेला. अशातच त्याचा विद्युत प्रवाहित कुंपनाला स्पर्श झाला.

The laborers were killed by the touch of an electric current | विद्युत प्रवाहित कुंपणाच्या स्पर्शाने मजूर ठार

विद्युत प्रवाहित कुंपणाच्या स्पर्शाने मजूर ठार

ठळक मुद्देअग्रवाल ऑईल मिल मधील घटना : मालकानेही केले दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्क
तळेगाव (श्या.पं.) : आर्वी मार्गावरील मुरलीधर दि. अग्रवाल ऑईल मिल मधील मजुराचा विद्युत प्रवाहित कुंपणाचा स्पर्श झाल्याने मृत्यू झाला. राहूल गणपत उईके (२३) रा. वर्धमनेरी असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी तळेगांव पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे.
प्राप्त माहीतीनुसार, मुरलीधर दिनकर अग्रवाल आईल मिल मध्ये सोमवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास राहूलसह एकूण ११ मजूर ट्रक मध्ये ढेपीचे पोते भरत होते. दरम्यान राहूल कुंपनाशेजारी असलेल्या रांजणाजवळ पाणी पिण्यासाठी गेला. अशातच त्याचा विद्युत प्रवाहित कुंपनाला स्पर्श झाला. यात राहूलचा जागीच मृत्यू झाला. सदर घटना लक्षात येताच इतर मजुरांनी त्याचा वाचविण्याचे प्रयत्न केले. शिवाय त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले. परंतु, त्यात ते यशस्वी झाले नाही. या घटनेची नोंद पोलिसांनी घेतली असून पुढील तपास सुरू आहे.

यापूर्वीही एकाला बसला झटका
दोन दिवसांपूर्वी राधेश्याम भगत या मजूराला कुंपनाला स्पर्श झाल्याने विद्युत प्रवाहाचा जबर झटका बसला होता. तेव्हा तो सुदैवाने थोडक्यात बचावला. त्यावेळी मिल मालकाला माहिती देण्यात आली होती. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. अशातच आज राहूलला आपले प्राण गमवावे लागल्याची चर्चा घटनास्थळी होती.

Web Title: The laborers were killed by the touch of an electric current

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात