जिल्ह्यातून कोटंबा, बाजारवाडा ठरलेय सुंदर ग्राम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 05:00 IST2021-02-17T05:00:00+5:302021-02-17T05:00:57+5:30
जिल्हा परिषदेच्या सभागृहात महात्मा गांधी स्वच्छग्राम स्पर्धा, आर. आर. पाटील सुंदर ग्राम स्पर्धा आणि आदर्श ग्रामसेवक पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. या सोहळ्याला जिल्हा परिषदच्या अध्यक्षा सरिता विजय गाखरे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे, उपाध्यक्ष वैशाली येरावार, सभापती मृणाल माटे, सरस्वती मडावी, माधव चंदनखेडे, जिल्हा परिषद सदस्य धनराज तेलंग, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विपुल जाधव, वित्त व लेखा अधिकारी सदाशिव शेळके यांची उपस्थिती होती.

जिल्ह्यातून कोटंबा, बाजारवाडा ठरलेय सुंदर ग्राम
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : गावातील स्वच्छता व्यवस्थापन, दायित्व, अपारंपारिक उर्जा, पर्यावरण, पादर्शकता आणि तंत्रज्ञानाचा वापर करुन स्मार्ट गाव बनविणाऱ्या ग्रामपंचायतींना आर.आर.पाटील (आबा) सुंदर ग्राम पुरस्काराने सन्मानित केले जाते. या स्पर्धेत तालुकास्तरावर बाजी मारुन जिल्हा स्तरावर पोहोचलेल्या ग्रामपंचायतीला ४० लाखांचा पुरस्कार दिला जातो. २०१९-२० चा जिल्हास्तरीय आर. आर. पाटील (आबा) सुंदर ग्राम पुरस्कार सेलू तालुक्यातील कोटंबा आणि आर्वी तालुक्यातील बाजारवाडा ग्रामपंचायतीने पटकाविला असून दोन्ही ग्रामपंचायतीला २०-२० लाखांचा पुरस्कार विभागून देण्यात आला.
जिल्हा परिषदेच्या सभागृहात महात्मा गांधी स्वच्छग्राम स्पर्धा, आर. आर. पाटील सुंदर ग्राम स्पर्धा आणि आदर्श ग्रामसेवक पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. या सोहळ्याला जिल्हा परिषदच्या अध्यक्षा सरिता विजय गाखरे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे, उपाध्यक्ष वैशाली येरावार, सभापती मृणाल माटे, सरस्वती मडावी, माधव चंदनखेडे, जिल्हा परिषद सदस्य धनराज तेलंग, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विपुल जाधव, वित्त व लेखा अधिकारी सदाशिव शेळके यांची उपस्थिती होती.
मान्यवरांच्या हस्ते विजेत्या ग्रामपंचायतच्या सरपंच आणि ग्रामसेवकांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायतीच्या सरपंचांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सुत्र संचालन अविनाश गोहाड यांनी केले तर आभार सेलूचे सहायक गटविकास अधिकारी शालीग्राम पडघन यांनी मानले. कार्यक्रमाला सर्व पुरस्कारप्राप्त ग्रामपंचायतीचे सरपंच, ग्रामसेवक व सदस्य उपस्थित होते.
तालुकास्तरीय सुंदर ग्रामला मिळाला दहा लाखांचा पुरस्कार
आर.आर. पाटील सुंदर ग्राम स्पर्धेत जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायतीने भाग घेतला होता. यामध्ये तालुक्यातून प्रथम आलेल्या ग्रामपंचायतींना दहा लाखांचा पुरस्कार देण्यात आला. यात वर्धा तालुक्यातील महाकाळ, देवळीतील इंझाळा, समुद्रपुरातील पाठर, हिंगणघाटातील सावली (वाघ), आर्वीतील बाजारवाडा, सेलुतील कोटंबा, आष्टीतील नवीन आष्टी तर कारंजातील पांजरा (गोंडी) या ग्रामपंचायतीचा समावेश आहे. यातील जिल्हास्तरावर प्रथम आलेल्या ग्रामपंचायतीला ४० लाखांचा पुरस्कार आहे. याकरिता कोटंबा आणि बाजारवाडा या दोन्ही ग्रामपंचायती पात्र ठरल्यात.
जिल्हा स्वच्छ ग्राम स्पर्धेत रसुलाबाद ग्रामपंचायत प्रथम
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त यावर्षी महात्मा गांधी स्वच्छ ग्राम स्पर्धा राबविण्यात आली. या स्पर्धेकरिता प्रत्येक तालुक्यातील एक ग्रामपंचायत निवडण्यात आली असून त्या ग्रामपंचायतीला एक लाखाचा पुरस्कार देण्यात आला. यात तालुकास्तरावर आर्वी तालुक्यातील रसुलाबाद, आष्टीतील आनंदवाडी, देवळीतील कोळोणा (घोडे), हिंगणघाटमधील मुरपाड (मनोरा), कारंजातील पांजरा (गोंडी), सेलूतील धानोली (मेघे), समुद्रपुरातील पाठर आणि वर्धा तालुक्यातील महाकाळ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. यापैकी रसुलाबाद ग्रामपंचायत ही जिल्ह्यातून प्रथम, आनंदवाडी द्वितीय तर महाकाळ ग्रामपंचायत तृतीय स्थानी आहे. या तिन्ही ग्रामपंचायतींना अनुक्रमे पाच लाख, तीन लाख व दोन लाखांचा पुरस्कार देण्यात आला.