ज्ञान मनुष्याला सक्षम बनविते
By Admin | Updated: July 10, 2014 23:46 IST2014-07-10T23:46:14+5:302014-07-10T23:46:14+5:30
शिक्षण म्हणजे रोजगार मिळण्याचे शिक्षण हे साधन नसून त्याचा संबंध व्यक्ती घडवण्यासाठी पण आहे. ज्ञान माणसाला सक्षम बनविते, धन मिळवून देते त्याचा व्यय कसा करावा हेही सांगते,

ज्ञान मनुष्याला सक्षम बनविते
गिरीश्वर मिश्र : न्यु इंग्लिश हायस्कूलचा उपक्रम
वर्धा : शिक्षण म्हणजे रोजगार मिळण्याचे शिक्षण हे साधन नसून त्याचा संबंध व्यक्ती घडवण्यासाठी पण आहे. ज्ञान माणसाला सक्षम बनविते, धन मिळवून देते त्याचा व्यय कसा करावा हेही सांगते, असे प्रतिपादन महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाचे कुलपती गिरीश्वर मिश्र यांनी केले.
न्यु इंग्लिश हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय या संस्थेचा १०० वा वर्धापन दिन व शताब्दी वर्षानिमित्त स्मरणिकेचा विमोचन समारंभ संस्थेच्या रंगमंदिर परिसरात पार पडला. यावेळी ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव अॅड. राजेंद्र खरे होते. प्रमुख पाहुणे म्हणून संस्था सहसचिव अशोक गोयनका, संचालक अॅड. सुरेश फत्तेपुरीया, प्रदीप बजाज, जयश्री वऱ्हाडपांडे, प्राचार्य विजय व्यास, उपमुख्याध्यापक प्रकाश नगराळे, उपप्राचार्य अजय चतुर, मुख्याध्यापिका कांचन कुलधरिया, अंजली गावंडे, सिवानी दास, पर्यवेक्षक केतकी साने, विद्या गुज्जेवार, बंडू दखने उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते शतकमहोत्सवी स्मरणिकेचे विमोचन करण्यात आले. पाहुण्यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना धनादेश व स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले. प. पूज्य ब्रम्हलीन बाबा महाराज सातारकर समाधी मंदिर संस्थान पुणे यांच्यातर्फे शिष्यवृत्ती प्राविण्यप्राप्त विद्यार्थ्यांना देण्यात आली. आजी व माजी शिक्षकवृंदांतर्फे गुणवंतांना रोख पारितोषिके देण्यात आली. बारावी परीक्षेत जिल्ह्यातून व महाविद्यालयातून प्रथम मेघना सोनछात्रा हिला एकंदर १०४५० रुपये चे रोख पारितोषिक मिळाले. दहावी परिक्षेत प्रथम अंजली थूल, न्यू.इं.कॉन्व्हेंट ची भाग्यश्री भांडेकर, न्यू.इं.अॅ.आॅफ जिनिअसचा देवांग वैद्य, एच.एस.सी. कला-वाणिज्य ची सोनाली पारिसे, एम.सी.व्ही.सी. मधून मयूर बारीकर या सर्व विद्यार्थ्याना प्रथम आल्याबद्दल पारितोषिक मिळाले.विविध विषयात प्राविण्यप्राप्त विद्यार्थ्यांना पारितोषिक देण्यात आले. प्रा. व्यास यांनी प्रास्ताविकात वर्षभरातील राबविलेले उपक्रम व कार्यक्रमाची माहिती दिली. संगीत शिक्षक अजय हेडावू यांनी सरस्वतीस्तवन सादर केले. याप्रसंगी अजय हेडावू व चमू यांनी गौरवगीत सादर केले. संचालन अनघा आगवण यांनी केले. गुणवंत विद्यार्थ्यांच्या बक्षिसांचे वाचन झाडे, निलिमा काळे, जवदंड, शेंदरे, बस्तावले यांनी केले. आभार प्रदर्शन उपप्राचार्य अजय चतूर यांनी केले.(जिल्हा प्रतिनिधी)