शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका?, इंधन दरवाढीचे संकट गडद; रसायने, खतांच्या किमतीतही मोठी वाढ
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
Infosys ची कमाल! विना कर्मचारी कपात AI आणण्याची तयारी; याशिवाय २० हजार फ्रेशर्सच्या नियुक्तीही होणार 
4
विधान परिषद निवडणूक: राष्ट्रवादी काँग्रेसकडून झिशान सिद्दिकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब!
5
'की घेतले न हे व्रत अंधतेने...' , आमदारकीची संधी हुकल्यानंतर केशव उपाध्येंची खास पोस्ट, सतरंजी उचले म्हणाऱ्यांनाही सुनावले
6
Stock Market Crash: कच्च्या तेलाच्या किंमतीत तेजी, शेअर बाजार जोरदार आपटला; Sensex ९०० अंकांनी तर निफ्टी २४००० च्या खाली
7
Vastu Shastra: देवघरात 'या' ७ गोष्टी केल्यास कधीच भासणार नाही धन-धान्याची उणीव!
8
West Bengal Election : धक्का दिल्याने वृद्धाचा मृत्यू, जिवंत मतदाराला ठरवलं 'मृत'; TMC कार्यकर्त्याचं डोकं फोडलं, दात पाडले
9
राजनाथ सिंह यांच्याकडून पाकला क्लीनचिट, संरक्षण मंत्र्यांचे वक्तव्य देशविरोधी; काँग्रेसचा घणाघात
10
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
11
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
12
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
13
काय वाईट दिवस आले याच्यावर! एकेकाळी बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्याचा व्हिडीओ पाहून चाहते चिंतेत
14
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
15
Bengaluru: बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
16
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
17
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
18
निरोगी आरोग्यासाठी आहे ‘डिजिटल फास्टिंग’ आवश्यक; सात प्रमुख फायदे कोणते? 'अशी' करा सुरुवात
19
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
20
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
Daily Top 2Weekly Top 5

गोठ्यात पती-पत्नीची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2019 05:00 IST

ओलीताची सात एकर शेती असून चार एकरात चणा व ३ एकरात कपाशीची लागवड केली आहे.रात्रीला ओलीत आणि वन्य प्राण्यांपासून पिकांचे संरक्षण करण्याकरिता दोघेही पती-पत्नी रात्रीला शेतात जागलीला जात. या दाम्पत्याला दोन मुले असून दोघेही बांधकामाचे काम करीत असल्याने आपापले कुटूंब घेऊन ते वेगवेगळे राहतात.

ठळक मुद्देडोरली शिवारातील घटना : दोघेही शेतात रात्रीला करायचे जागली

लोकमत न्यूज नेटवर्कघोराड : गावापासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या डोरली येथील शेतशिवारातील गोठ्यात पती-पत्नीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. मंगळवारी सकाळी परिसरात दुर्गंधी सुटल्यामुळे ही घटना उघडकीस आली असून दोन दिवसांपूर्वीच त्यांची हत्या झाल्याचा संशय व्यक्त होत आहे.शेतकरी महादेव लक्ष्मण खिरडकर (६०) व पत्नी लक्ष्मी महादेव खिरडकर (५५) रा. डोरली असे मृत शेतकरी पती-पत्नीचे नाव आहे. त्यांच्याकडे ओलीताची सात एकर शेती असून चार एकरात चणा व ३ एकरात कपाशीची लागवड केली आहे.रात्रीला ओलीत आणि वन्य प्राण्यांपासून पिकांचे संरक्षण करण्याकरिता दोघेही पती-पत्नी रात्रीला शेतात जागलीला जात. या दाम्पत्याला दोन मुले असून दोघेही बांधकामाचे काम करीत असल्याने आपापले कुटूंब घेऊन ते वेगवेगळे राहतात.त्यांचे शेतशिवारातील सर्व शेतकऱ्यांशी चांगले संबंध होते. त्यांचा कुणासोबतही काही वाद नव्हता. आपल्या कामातच व्यस्त राहणाºया या दोन्ही पती-पत्नींची शेतातच हत्या करण्यात आल्याने अनेक शेतकऱ्यांना धक्का बसला.मंगळवारी सकाळी परिसरात दुर्गंधी पसरल्याने पोलीस पाटील निलेश गुजरकर यांनी पोलीस स्टेशनला माहिती दिली. तत्काळ पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला. त्यांना शेतातील गोठ्यात शेतकरी महादेव लक्ष्मण खिरडकर व पत्नी लक्ष्मी या दोघांचा मृतदेह आढळून आला.महादेव यांचा चेहरा विद्रुप झाला असून त्याची हत्या दगडाने ठेचून तर पत्नी लक्ष्मीच्या गळ्यावर कपाशी काढण्याचा लोखंडी चिमटा दाबून हत्या केल्या संशय घटनास्थळावर दिसून आलेल्या परिस्थितीनुसार व्यक्त करण्यात आला आहे. मृतदेहांची अवस्था बघता दोघांचीही हत्या रविवारीच रात्री झाली असावी असा अंदाज व्यक्त केल्या जात आहे. त्यांच्या हत्येचे कारण काय, या शोध घेणे पोलिसांपुढे आव्हानच ठरणार आहे. सेलू पोलिसांचा मोठा ताफा घटनास्थळी दाखल झाला असून श्वानपथकाच्या सहाय्याने आरोपींचा शोध घेत आहेत.गावात हळहळ; शवविच्छेदनानंतर होणार उलगडापोलिसांनी घटनास्थळावरुन पती-पत्नीचे मृतदेह ताब्यात घेतले असून ते शवविच्छेदनाकरिता पाठविण्यात आले आहे. आता शवविच्छेदनानंतर त्यांची हत्या कशाने व केव्हा झाली असावी याचा उलगडा झाल्यानंतरच पोलिसांना तपासाची दिशा ठरविता येणार आहे.मृत महादेव खिरडकर यांचा मुख्य व्यवसाय राजकाम होता. घरबांधकाम करीत असताना त्यांचा अपघात झाल्याने ते अपंग झाले. नंतर त्यांनी या व्यवसायाकडे दुर्लक्ष करुन शेती कसायला सुरुवात केली. चांगले उत्पन्न घेण्यासाठी सतत धडपडणाºया पती-पत्नीची हत्या झाल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे. माहिती मिळातच अख्खा गाव घटनास्थळावर गोळा झाला होता. 

टॅग्स :Murderखून