वडिलांच्या डोक्यावर हातोडी मारून केली हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2021 09:32 PM2021-09-06T21:32:27+5:302021-09-06T21:36:32+5:30

Wardha News आईला मारहाण केल्याच्या कारणातून मुलाने वडिलांच्या डोक्यावर हातोडीने मारहाण करून जखमी केले होते. याप्रकरणात जखमी वडिलांचा ३ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने मुलावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

Killed father with a hammer in Wardha district | वडिलांच्या डोक्यावर हातोडी मारून केली हत्या

वडिलांच्या डोक्यावर हातोडी मारून केली हत्या

googlenewsNext
ठळक मुद्देसावंगी परिसरात घडली होती घटनाआरोपी मुलास अटक

लोकमत न्यूज नेटवर्क

वर्धा : आईला मारहाण केल्याच्या कारणातून मुलाने वडिलांच्या डोक्यावर हातोडीने मारहाण करून जखमी केले होते. ही घटना ३१ ऑगस्ट रोजी घडली होती. याप्रकरणात जखमी वडिलांचा सेवाग्राम येथील रुग्णालयात ३ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने मुलावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी मुलास पोलिसांनी अटक केल्याची माहिती सावंगी पोलिसांनी दिली. पद्माकर मारोतराव नखाते (५२) असे मृतकाचे नाव आहे.

(Killed father with a hammer in Wardha district)

पद्माकर याने दारूच्या नशेत त्याच्या पत्नीशी वाद करून तिला मारहाण केली होती. त्यामुळे त्याची पत्नी माहेरी गेली. पद्माकर हा पत्नीच्या शोधार्थ निघाला असता वाटेत त्याला मुलगा पवन भेटला. पवन याने वडील पद्माकर याला आईशी वाद का केला, या कारणातून वाद करीत डोक्यावर हातोडीने मारहाण केली होती. पवन यानेच जखमी अवस्थेत पद्माकरला सेवाग्राम येथील रुग्णालयात दाखल केले होते. पद्माकर याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असताना ३ सप्टेंबर रोजी त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे पवन पद्माकर नखाते (२०), रा. सावंगी मेघे याच्याविरुद्ध दाखल केलेल्या कलमात वाढ करून खुनाचा गुन्हा दाखल करीत त्यास अटक केली.

पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत सोळंकी, उपविभागीय पोलीस अधिकारी पीयूष जगताप यांनी घटनास्थळी भेट देत तपासाबाबत मार्गदर्शन केले. पुढील तपास ठाणेदार बाबासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक मोहन धोंगडे, प्रकाश खर्डे करीत आहेत.

Web Title: Killed father with a hammer in Wardha district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.