खाकीतील ‘त्या’ कोविड योद्धांचीही होतेय आरोग्य तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2020 05:00 IST2020-04-29T05:00:00+5:302020-04-29T05:00:25+5:30

इतर जिल्ह्यातून वर्धा जिल्ह्यात भाजीपाला, दूध, फळ व मांस आणण्यावर बंदी घालण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आलेल्या सूचनांना केंद्रस्थानी ठेऊन वर्धा जिल्ह्यातील एकूण १७ बॉडर सील पॉर्इंटवर पोलीस अधिकारी व कर्मचारी तसेच गृहरक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्याकडून प्रत्येक वाहनाची तपासणी केली जात आहे.

Khaki's 'those' Kovid warriors also get health check-ups | खाकीतील ‘त्या’ कोविड योद्धांचीही होतेय आरोग्य तपासणी

खाकीतील ‘त्या’ कोविड योद्धांचीही होतेय आरोग्य तपासणी

ठळक मुद्देबॉर्डर सील पॉर्इंटवर राबविला जातोय विशेष उपक्रम : डोळ्यात तेल घालून घेताहेत प्रत्येक वाहनाची झडती

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : कोरोनोच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या सीमा सील करण्यात आल्या आहेत. शिवाय वर्धा जिल्ह्याशेजारी असलेल्या नागपूर, अमरावती व यवतमाळ येथून वर्धा जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून ऊन, पाऊस आणि वादळाची तमा न बाळगता वर्धा जिल्ह्यातील १७ बॉडर सील पॉॅर्इंटवर पोलीस अधिकारी, कर्मचारी व गृहरक्षक दलाचे जवान हे कोविड योद्धा खडा पहारा देत आहेत. लॉकडाऊनच्या काळात जीवनावश्यक वस्तूची वाहतूक सुरू आहे. याच साहित्याची वाहतूक करणाऱ्यांच्या संपर्कात हे कोविड योद्धा येत असल्याने त्यांचीही आता आरोग्य तपासणी केली जात आहे.
नागपूर, अमरावती व यवतमाळ येथे कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. याच जिल्ह्यातून वर्धा जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून जिल्ह्याच्या सीमा सील करण्यात आल्या आहेत. शिवाय इतर जिल्ह्यातून वर्धा जिल्ह्यात भाजीपाला, दूध, फळ व मांस आणण्यावर बंदी घालण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आलेल्या सूचनांना केंद्रस्थानी ठेऊन वर्धा जिल्ह्यातील एकूण १७ बॉडर सील पॉर्इंटवर पोलीस अधिकारी व कर्मचारी तसेच गृहरक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्याकडून प्रत्येक वाहनाची तपासणी केली जात आहे. बॉडर सील पार्इंटवर कर्तव्य बजावत असलेले या कोविड योद्धांचा इतर जिल्ह्यातील व्यक्तींशी थेट संपर्क येत असल्याने या व्यक्तींची आरोग्य तपासणी करण्याची माहीम हाती घेण्यात आली आहे. हिंगणघाट व वर्धा उपविभागातील बॉडर सील पॉर्इंटवर कर्तव्य बजावणाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली असून पुलगाव व आर्वी उपविभागातील सील पॉर्इंटवर कर्तव्य बजावत असलेल्यांची आरोग्य तपासणी लवकरच करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

१९२ व्यक्तींचा खडा पहारा
वर्धा जिल्ह्यातील एकूण १७ बॉर्डर सील पॉर्इंटवर एकूण ३२ पोलीस अधिकारी तसेच १६० पोलीस कर्मचारी आणि गृहरक्षक दलाचे जवान खडा पहारा देत आहेत. सुरूवातीला या बॉडर सील पॉर्इंटवर १२८ पोलीस अधिकारी व कर्मचारी तैनात करण्यात आले होते. या सर्व कोविड योद्धांची आरोग्य तपासणी केली जात आहे. या अधिकाऱ्यांसह कर्मचाºयांना मास्क, शिल्ड व सॅनिटायझर वितरीत करण्यात आले आहे.

१२८ अधिकारीसह कर्मचारी मुख्यालयी
वर्धा जिल्ह्यातील १७ बॉडर सील पॉर्इंटवर सुरूवातीला एकूण १२८ पोलीस अधिकारी व कर्मचाºयांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर त्यांच्या जागी दुसरे एकूण १९२ पोलीस अधिकारी, कर्मचारी व गृहरक्षक दलाचे जवान नियुक्त करण्यात आले आहे. तर पूर्वीच्या १२८ पोलीस अधिकारी व कर्मचाºयांना मुख्यालयी बोलावण्यात आले आहे. ते निरोगी आहेत काय याची चाचपडताळणी करण्यासाठी त्यांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. त्यानंतर या अधिकारी व कर्मचाºयांना पुन्हा बॉडर सील पॉर्इंटवर पाठविण्यात येणार आहेत.
तर सध्या बॉडर सील पॉर्इंटवर कार्यरत असलेल्यांना पुर्वीचे मनुष्यबळ सज्ज झाल्यावर मुख्यालयी पाचारण करून त्यांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. एकूणच आळीपाळीने आरोग्य तपासणी करून हे कोविड योद्धा आपले कर्तव्य बजावणार आहेत.

वर्धा जिल्ह्यातील १७ बॉडर सील पॉर्इंटवरील पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचारी तसेच गृहरक्षक दलाच्या जवानांची आरोग्य तपासणी करताना आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी.

बॉडर सील पॉर्इंटवर कर्तव्य बजावणाऱ्यांचा थेट सपर्क जीवनावश्यक वस्तूची वाहतूक करणाऱ्यांशी येतो. त्यामुळे त्यांची वेळोवेळी आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. सध्यास्थितीत हिंगणघाट व वर्धा उपविभागातील बॉडर सील पॉर्इंटवरील अधिकारी व कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. लवकरच पुलगाव आणि आर्वी उपविभागातील बॉडर सील पॉर्इंटवरील अधिकारी व कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे.
- नीलेश मोरे, अपर पोलीस अधीक्षक, वर्धा.

Web Title: Khaki's 'those' Kovid warriors also get health check-ups

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.