खासदारांनी दिले मुख्यमंत्री शेतकरी सहायता निधीत ५० हजार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2017 00:07 IST2017-07-30T00:07:19+5:302017-07-30T00:07:58+5:30
राज्य शासनाने जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमाफीकरिता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकºयांकरिता .....

खासदारांनी दिले मुख्यमंत्री शेतकरी सहायता निधीत ५० हजार
ठळक मुद्देधनादेशाच्या माध्यमातून रक्कम केली सुपूर्द
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : राज्य शासनाने जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमाफीकरिता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकºयांकरिता सर्व नागरिकांनी यथाशक्ती योगदान देण्याचे आवाहन केले होते. त्याला अनुसरून तथा कर्जमाफी घोषित होत असताना केलेल्या संकल्पानुसार खासदार रामदास तडस यांनी लोकसभेचे एक महिन्याचे वेतन ५० हजार धनादेशाच्या माध्यमातून शुक्रवारी विधान भवन मुंबई येथे मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केले.
मुख्यमंत्र्यांच्या आवाहनानुसार अधिकाधिक नागरिकांनी यथाशक्ती मदत करावी, असे आवाहनही खा. तडस यांनी याप्रसंगी केले.