अवघ्या तीन तासांत आरोपीस ठोकल्या बेड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2019 23:18 IST2019-08-30T23:18:06+5:302019-08-30T23:18:26+5:30
आरोपीला अवघ्या तीन तासांत हुडकून काढून जेरबंद करण्यात स्थानिक पोलिसांना यश आले आहे. कमलेश मोरे, असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून तो आरोपीचा भाचा आहे, हे विशेष. भोजराज झोडापे याच्या हत्ये प्रकरणी तक्रारीवरून समुद्रपूर पोलिसांनी आरोपी कमलेश मोरे यांच्याविरुद्ध भादंविच्या कलम ३०२ अन्वये गुन्ह्याची नोंद घेतली.

अवघ्या तीन तासांत आरोपीस ठोकल्या बेड्या
लोकमत न्यूज नेटवर्क
समुद्रपूर : येथील भालकर वॉर्ड भागातील रहिवासी भोजराज झोडापे यांची हत्या करण्यात आली. या प्रकरणातील आरोपीला अवघ्या तीन तासांत हुडकून काढून जेरबंद करण्यात स्थानिक पोलिसांना यश आले आहे. कमलेश मोरे, असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून तो आरोपीचा भाचा आहे, हे विशेष.
भोजराज झोडापे याच्या हत्ये प्रकरणी तक्रारीवरून समुद्रपूर पोलिसांनी आरोपी कमलेश मोरे यांच्याविरुद्ध भादंविच्या कलम ३०२ अन्वये गुन्ह्याची नोंद घेतली. घटनेच्यानंतर आरोपीने घटनास्थळावरून यशस्वी पळ काढल्याने त्याला जेरबंद करणे हे समुद्रपूर पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. त्याच्या शोधार्थ समुद्रपूर पोलिसांच्या सुमारे तीन चमू रवाना करण्यात आली होती. अशातच खात्रीदायक माहितीच्या आधारे डी. बी. पथकाचे अरविंद येनुरकर, रवी पुरोहित, आशीष गेडाम, वैभव चरडे यांनी नागपूर येथील जयताळा चौक परिसरातून अटक केली. या आरोपीकडून पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेला चाकू जप्त केला आहे. शुक्रवारी समुद्रपूर पोलिसांनी अटकेतील आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याचे दोन दिवसीय पोलीस कोठडीत रवानगी केली.