शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण पत्रकारांच्या धैर्यशीलतेमुळेच पत्रकारिता अजूनही जिवंत आहे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2024 17:28 IST

Vardha : श्रीपाद अपराजित श्रमिक पत्रकार संघातर्फे जिल्हास्तरीय कार्यशाळा

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : ग्रामीण पत्रकारांच्या धैर्यशीलतेमुळेच पत्रकारिता जीवंत आहे. आपला अहंकार बाजूला ठेवून सामाजिक कार्यात भाग घ्यावा, समाजभाव हा महत्त्वाचा विषय आहे. सामाजिक व्यथा, अवतीभवतीच्या वेदना पत्रकारांनी लेखनीतून मांडाव्यात. माणूस मंगळावर गेला असला तरी शेजान्यांपर्यंत पोहोचू शकला नाही. पत्रकारांनी विवेक जपण्याचं काम करावं. भाषणाचे व्याकरण चुकले तरी चालेल; मात्र, माणसाचे आचरण चुकता कामा नये, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार (नागपूर) श्रीपाद अपराजित यांनी केले.

वर्धा श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने रविवारी स्थानिक दादाजी धूनीवाले मठ सभागृहात आयोजित जिल्हास्तरीय पत्रकार कार्यशाळेत ते बोलत होते. व्यासपीठावर ज्येष्ठ पत्रकार (नागपूर) प्रमोद काळबांडे, वैद्यकीय जनजागृती मंचचे अध्यक्ष डौं, सचिन पावडे, वर्धा श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रवीण धोपटे, श्रमिक पत्रकार संघाचे सचिव डॉ. राजेंद्र मुंढे, ज्येष्ठ पत्रकार प्रशांत देशमुख, नाट्य सिने दिग्दर्शक हरीश इथापे, किसान अधिकार अभियानचे मुख्य प्रेरक अविनाश काकडे, ज्येष्ठ समाजसेवक सुनील बुरांडे, वर्धा यांची प्रमुख उपस्थिती होती. 

श्रीपाद अपराजित पुढे म्हणाले इंटरनेटवर प्रादेशिक भाषांचे वलय आहे. दहापैकी नऊ प्रादेशिक भाषा आघाडीवर आहेत. इतके या क्षेत्रात प्रादेशिक भाषांचे महत्त्व वाढले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी "बहिष्कृत भारत' नावाचे साप्ताहिक काढले होते. यात मराठीचे वर्गणीदार झाले पाहिजेत, असे म्हटले आहे. हे वर्गणीदार आधी पत्रकारांनी व्हावे. तंत्रज्ञान स्नेही व्हावे आणि व्यसनापासून दूर राहावे, यासोबत पत्रकारांनी मनापासून संवादी व्हावे असेही ते म्हणाले. समाजमाध्यमांचा मोठा धोका पोहोचत असल्याचे सांगून विना गेटकिपरचा सिनेमा म्हणजे समाजमाध्यम असल्याची टीका त्यांनी केली. पत्रकारांनी आणीव आणि सहवेदना ठेवून पत्रकारिता करण्याचे आवाहन श्रीपाद अपराजित यांनी केले. 

यावेळी पत्रकार प्रशांत देशमुख यांनी 'बदलती पत्रकारिता आणि आव्हाने' या विषयावर तर डॉ. राजेंद मुंढे यांनी महात्मा गांधी, विनोबा भावे यांची कर्मभूमी असलेले वर्धा से पत्रकारांसाठी पोषक वातावरण निर्माण करून देणारे स्थळ असल्याचे सांगितले. प्रास्ताविक प्रवीण धोपटे यांनी केले. सूत्रसंचालन आनंद इंगोले यांनी केले. प्रफुल्ल व्यास यांनी आभार मानले. या कार्यशाळेला जिल्ह्यातील पत्रकारांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

शोषित, पीडित यांच्या प्रश्नांवर लिखाण गरजेचे दक्षिण आफ्रिकेतील फोटो जर्नलिस्ट केविन कार्टर यांचे उदाहरण देत प्रमोद काळबांडे म्हणाले, पत्रकारिता करताना आपण समाजासाठी काहीतरी करायला पाहिजे. वर्धा जिल्ह्यातील पारधी बेड्यांसह भटक्या विमुक्त समाज वस्त्यांत जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या व त्या प्रकर्षान वृत्तपत्राच्या माध्यमातून मांडल्याचा पत्रकारितेतील थरारक अनुभवपट त्यांनी मांडला. यावेळी त्यांनी आपण सहकायांच्या मदतीने अशा वंचित घटकांसाठी ५२ शाळा सुरू केल्याचेही नम्रपणे नमूद केले. पत्रकारांनी भटके, अनुसूचित जाती जमाती, पारधी, भाट, शोषित, पीडित यांच्या प्रश्नांवर लिखाण केले पाहिजे, आज सोशल मीडियासारखे माध्यम आपल्याजवळ असताना चाकूने गळा कापायचा की भाजी, हे आपण ठरवावे, असेही प्रमोद काळबांडे म्हणाले.

टॅग्स :Journalistपत्रकारwardha-acवर्धा