हत्येतील आरोपी जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2018 23:35 IST2018-09-13T23:35:16+5:302018-09-13T23:35:53+5:30

पतीसोबत वाद घालत जिवानिशी ठार मारण्याच्या उद्देशाने मारहाण केली. त्यानंतर बेशुध्द अवस्थेत घरी आणून सोडल्याने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान मृत्यू झाला. अशी तक्रार मृतक राजू देवराव कुंभरे रा. ममदापूर यांची पत्नी मंदा कुंभरे यांनी आज पोलिसात केली.

Jailed murderer | हत्येतील आरोपी जेरबंद

हत्येतील आरोपी जेरबंद

ठळक मुद्देकुंभरे हत्या प्रकरण : दोन दिवस पोलीस कोठडी

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : पतीसोबत वाद घालत जिवानिशी ठार मारण्याच्या उद्देशाने मारहाण केली. त्यानंतर बेशुध्द अवस्थेत घरी आणून सोडल्याने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान मृत्यू झाला. अशी तक्रार मृतक राजू देवराव कुंभरे रा. ममदापूर यांची पत्नी मंदा कुंभरे यांनी आज पोलिसात केली. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल करुन आरोपी हरिदास भाऊराव कुंभारे याला अटक केली. न्यायालयात हजर केले असता १४ सप्टेंबरपर्यंत दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
मृतक राजू कुभरे (४०) रा.ममदापूर यांच्यासोबत आरोपी हरिदास कुंभरे याने १ आॅगस्ट रोजी दुपारी साडेचार वाजता वाद केला. जीवानिशी ठार करण्याच्या उद्देशाने गोठ्यातील दांडक्याने जबर मारहाण केली.यात राजुच्या डोक्याला गंभीर मार लागला. पुरावा नष्ट करण्यासाठी सांडलेले रक्त पाण्याचे धुवून टाकले आणि जखमी अवस्थेत राजुला घरी आणून सोडले.त्यानंतर लगेच राजुला त्यांच्या घरच्यांनी अमरावतीच्या रुग्णालयात दाखल केले. येथेच २ आॅगस्ट रोजी त्यांचा मृत्यू झाला. याबाबत राजुंची पत्नी मंदा यांनी गुरुवारला पोलिसात तक्रार नोंदविली.
पोलिसांनी गुन्हा दाखल करीत आरोपी हरिदास भाऊराव कुंभरेला अटक केली. त्याला दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस अधीक्षक बसवराज तेली यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार रवी राठोड, पोलीस उपनिरीक्षक प्रदीपकुमार राठोड, पोलीस कर्मचारी निलेश पेटकर, सचिन साठे, हकिम शेख हे करीत आहे.

Web Title: Jailed murderer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.