शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
5
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
6
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
7
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
8
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
9
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
10
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
11
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
12
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
13
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
16
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
17
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
18
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
19
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
20
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?

शेतकऱ्यांना कायदे मान्य नसल्याने ते परत घेणे सरकारची जबाबदारी; भुपेश बघेल यांचं मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2021 13:44 IST

सर्वोच्च न्यायालयाने सुध्दा निर्णय दिलेला असल्याचे मत छत्तीसगड राज्याचे मुख्यमंत्री भुपेश बघेल यांनी पत्रकारांशी चर्चा करतांना व्यक्त केले.

वर्धा: गांधीजींचा आमच्या राज्याशी जवळचा संबंध राहिला आहे.ते दोनदा आले.आमचा परिवारही गांधी विनोबांच्या विचारांचा असून वडिल सर्वोदयी होते. गांधीजींच्या १५०व्या जयंती पर्वावर त्यांच्या विचारांप्रमाणे विविध योजना तयार करून राज्यात अमलात आणल्या आहे.यातून ग्रामस्वावंलबनातून विकास,रोजगार उपलब्ध करून देण्यावर आमचा भर आहे. सध्या शेतकऱ्यांचे मोठे आंदोलन सुरू असून शेतकऱ्यांना कायदे मान्य नसल्याने ते परत घेणे सरकारची जबाबदारी आहे. आता तर सर्वोच्च न्यायालयाने सुध्दा निर्णय दिलेला असल्याचे मत छत्तीसगड राज्याचे मुख्यमंत्री भुपेश बघेल यांनी पत्रकारांशी चर्चा करतांना व्यक्त केले.

प्रसिद्ध महात्मा गांधीजींच्या आश्रमाला मुख्यमंत्री बघेल यांनी भेट दिली.त्यांच्या सोबत छत्तीसगढ कांग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मोहन मरकाम, उपाध्यक्ष गिरीश देवांगण,कोषाध्यक्ष रामगोपाल अग्रवाल,प्रदीप शर्मा इ.उपस्थित होते.ते नयी तालिम समिती परिसरात सुरू असलेल्या कांग्रेसच्या अहिंसाके रास्ते या सुरू असलेल्या शिबिरातील चर्चा सत्रात सहभागी होण्यासाठी ते आले होते. मुख्यमंत्री बघेल यांनी सांगितले आमच्या परिवारात स्वातंत्र सैनिक असल्याने परिवार गांधी विनोबांच्या विचारांशी जुळलेला आहे.येवढेच नाही तर छत्तीसगढ जनतेशी जिवाळ्यांचे संबंध आहेत.महिलांच्या पुढाकाराने सरकारने जैविक शेतीसाठी पुढाकार घेतला असून यात सरकार शेतकऱ्यांकडून शेणखत विकत घेऊन गांडूळ खते बणवून त्याचा उपयोग शेतीसाठी करण्यात येत आहेत.यामुळे रासायनिक खतांपासून होणाऱ्या दुष्परिणामाल आळा बसेल.यातून गाव स्वावलंबनाच्या दिशेने वाटचाल करीत आहे असे सांगितले.

नक्षलवादी बाबत ते म्हणाले शांती,अहिंसेला विकल्प नाही.गांधीजींचा मार्ग आपल्या समोर आहे.हिंसेला लोकं कंटाळले आहेत.आम्ही विकासाकरीत जमिन देणे,तेंदूपत्त्याला अधिक भाव देणे,कोडूकुटका याला समर्थन यामुळे रोजगार उपलब्ध होत असल्याने  जनतेचा विश्र्वास आम्ही जिंकून घेतला.मागील सरकारपेक्षा दोनच वर्षांत वातावरण बदलले आहे. शेतकरी आंदोलनाला बाबत विचारले असता शेतकऱ्यांना कायदे मान्य नसल्याने ते मागे घेतले पाहिजे.देशातील मोठमोठे उद्योग सरकार विकत आहेत.आता लक्ष शेतकऱ्यांच्या जमिनीकडे लागले आहेत.हे सर्व पुंजीवाद्या़साठी होत असल्याची टिकाही बघेल यांनी केली.शेवटी कांग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाबाबत विचारले असता अध्यक्ष सोनिया गांधी आहेत.पुढे पसंती मात्र राहुल गांधी यांना राहिल असे त्यांनी सांगितले.

आश्रमात आगमण होताच सूतमाळ आणि पुस्तक देऊन मुख्यमंत्री भुपेश बघेल यांचे स्वागत सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानचे मंत्री मुकुंद मस्के यांनी केले.तसेच सरपंच रोशना जामलेकर यांनी सुध्दा सर्वात केले.मार्गदर्शिका अश्विनी बघेल यांनी आदी निवास,बा कुटी,आखरी निवास,बापू कुटी,बापू दप्तर इ.ची माहिती तसेच इतिहास सांगितला.बापू कुटीत सर्वधर्म प्रार्थना झाली.

गांधीजींनी लावलेल्या १९३६ मधील पिंपळ वृक्षाला पाणी घातले.बापू कुटी परिसरातील दानपेटीत ५ हजार रूपये टाकले. नोंदवहीत त्यांनी अभिप्राय लिहिला. आश्रमचे संचालक अविनाश काकडे,शोभा कवाडकर,कार्यालय मंत्री सिध्देश्वर उंबरकर,मार्गदर्शिका संगिता चव्हाण, दीपाली उंबरकर तसेच रूपाली उगले, नामदेव ढोले,आकाश लोखंडे,विजय धुमाळे, रामेश्वर गाखरे, सचिन हुडे,प्रशांत ताकसांडे इ.कार्यकर्ते उपस्थित होते‌. जिल्हा पोलिस अधीक्षक प्रशांत होळकर, सेवाग्राम पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक कांचन पांडे सुध्दा हजर होते.

टॅग्स :FarmerशेतकरीCentral Governmentकेंद्र सरकार