सिंचन प्रकल्प २०१८ पर्यंत पूर्णत्वास जाणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2017 23:33 IST2017-08-29T23:33:21+5:302017-08-29T23:33:41+5:30
तत्कालीन शासनाच्या धोरणात्मक निर्णयाअभावी सिंचन प्रकल्प ३० वर्षांपासून रखडले आहे. परंपरागत कोरडवाहू शेती, पाणी नाही, शेतमालाला भाव नाही...

सिंचन प्रकल्प २०१८ पर्यंत पूर्णत्वास जाणार
लोकमत न्यूज नेटवर्क
देवळी : तत्कालीन शासनाच्या धोरणात्मक निर्णयाअभावी सिंचन प्रकल्प ३० वर्षांपासून रखडले आहे. परंपरागत कोरडवाहू शेती, पाणी नाही, शेतमालाला भाव नाही अशा स्थितीत विदर्भात आत्महत्यांचे प्रमाण वाढले. यावर मात म्हणून पंतप्रधानांनी निम्न वर्धासह इतर ५० टक्के पूर्ण झालेल्या प्रकल्पांना २०१८ पर्यंत पूर्ण करण्याचा निर्णय घेतला, असे मत खा. रामदास तडस यांनी व्यक्त केले.
कृषी विज्ञान केंद्र सेलसुराद्वारे संकल्प से सिद्धी हा २०२२ पर्यंत न्यू इंडिया मंथन कार्यक्रम नगर भवनात पार पडला. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जि.प. कृषी पशुसंवर्धन सभापती मुकेश भिसे तर अतिथी म्हणून पं.स. सभापती विद्या भुजाडे, नगराध्यक्ष सुचिता मडावी, यवतमाळचे कृषी संशोधन संचालक डॉ. चंद्रकांत पाटील, अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्वर भारती, गोविंद मोरे सांगली, उपविभागीय कृषी अधिकारी जी.आर. कापसे, मधुमक्षिका विकास केंद्राचे डॉ. गोपाल पालीवाल, न.प. उपाध्यक्ष प्रा. नरेंद्र मदनकर उपस्थित होते.
शोषक किडीच्या उच्चाटनासह पांढºया माशीच्या नियंत्रणासाठी तंत्रज्ञानाची गरज आहे. यासाठी कृषी विद्यार्थ्यांनी शेतकºयांना अत्याधुनिक कृषी ज्ञानाची माहिती द्यावी. प्रगतशील शेतकºयांकडून पीक उत्पादनाचे रहस्य जाणून घेत संकल्प से सिद्धी या धाडसी उपक्रमाला पूर्णत्वास नेले पाहिजे, असे कृषी तज्ज्ञांनी सांगितले. माती परिक्षणाचे ७ हजार ५०० हेक्टरचे ध्येय पूर्ण झाले नाही. माती परिक्षणास शेतकºयांना तयार करावे. शेतकरी समृद्ध करण्यासाठी कृषी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनात कमी खर्चाच्या शेतीवर भर द्यावा, असे भिसे यांनी सांगितले. यावेळी कृषी महा. नागपूर, रामकृष्ण बजाज कृषी महा. पिपरी व सेलसुरा कृषी तंत्रविज्ञानच्या विद्यार्थ्यांना २०१७ ते २०२२ पर्यंतच्या संकल्प से सिद्धीबाबत शपथ देण्यात आली. प्रास्ताविक डॉ. प्रशांत उंबरकर यांनी, संचालन प्रा. उज्वला शिरसाट यांनी केले तर आभार डॉ. धनराज चौधरी यांनी मानले. कार्यक्रमाला आर्वीचे तालुका कृषी अधिकारी पी.डी. गुल्हाणे, आष्टीचे प्रमोद पेटकर, सेलूचे बापुराव वाघमारे, समुद्रपूरचे संजय हाडके, हिंगणघाटचे राष्ट्रपाल मेश्राम, वर्धेचे रेहपाडे व शेतकरी उपस्थित होते.