एसडीओ पोहोचले बांधावर शेतकऱ्यांशी साधला संवाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2019 06:00 IST2019-11-23T06:00:00+5:302019-11-23T06:00:19+5:30
प्रारंभी अनेक दिवसांपासून रखडलेल्या पवनार ते महाकाळ या पांदणरस्त्यावर लक्ष केंद्रित करून शेतकऱ्यांची बैठक बोलावली. दुसºया दिवशी तहसीलदार प्रीती डुडुलकर, मंडळ अधिकारी, तलाठी व शेतकऱ्यांच्या उपस्थितीत मार्किंग करून अडीच किलोमीटरचा पांदण रस्ता मोकळा करण्याचे काम सुरू केले.

एसडीओ पोहोचले बांधावर शेतकऱ्यांशी साधला संवाद
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची अडचण ठरणाऱ्या पांदण रस्त्याच्या कामाला आता उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे यांनी गती दिली आहे. वर्धा तालुक्यातील पवनार येथील पांदणरस्त्यानंतर आता वडद येथीलही पांदण रस्त्याचे कामाला उद्यापासून सुरुवात होणार आहे. त्यासंदर्भात शुक्रवारी वडद येथील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन बगळे यांनी शेतकऱ्यांशी चर्चा केली.
शेतापर्यंत जाण्याकरिता असलेल्या पांदण रस्त्यांवर अनेक शेतकऱ्यांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नेहमीच वाद होत असतात. त्यानंतर हे वाद पोलीस किंवा महसूल विभागाकडे आल्यानंतर शेतकऱ्यांची न्यायासाठी पायपीट सुरु होते. यासर्व त्रासातून शेतकºयांना मुक्त करीत त्यांच्याच समन्वयातून पांदण रस्ता मोकळा करण्यासाठी उपविभागीय अधिकारी बगळे यांनी पुढाकार घेत लोकसहभागातून कामाला सुुरुवात केली आहे.
प्रारंभी अनेक दिवसांपासून रखडलेल्या पवनार ते महाकाळ या पांदणरस्त्यावर लक्ष केंद्रित करून शेतकऱ्यांची बैठक बोलावली. दुसºया दिवशी तहसीलदार प्रीती डुडुलकर, मंडळ अधिकारी, तलाठी व शेतकऱ्यांच्या उपस्थितीत मार्किंग करून अडीच किलोमीटरचा पांदण रस्ता मोकळा करण्याचे काम सुरू केले. शुक्रवारी वडद ते बोपापूर या साडेतीन किलोमीटरच्या पांदण रस्त्याकरिता शेताच्या बांधावरच शेतकऱ्यांची बैठक घेतली.
यावेळी नायब तहसीलदार जाधवर, नायब तहसीलदार स्वप्नील दिगलवार, मंडळ अधिकारी पांडे, तलाठी व वडदचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच शेतकरी उपस्थित होते. शनिवारी या पांदण रस्त्याचे मार्कींग करून रविवारपासून कामाला सुरुवात करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.