शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
2
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
3
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
4
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
5
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
6
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
7
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
8
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
9
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
10
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
11
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
12
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
13
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
14
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
15
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
16
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
17
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
18
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
19
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

आमदारांकडून शहरातील विकासकामांची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2018 23:21 IST

शहरात विविध विकासकामे सुरू आहेत. या कामांचा दर्जा, वेग व नागरिकांच्या तक्रारींची दखल घेवून रविवारी आमदार डॉ. पंकज भोयर यांनी शहराच्या विविध विकास कामांची पाहणी केली.

ठळक मुद्देपंकज भोयर : कामात अनियमितता व दर्जा ढासळल्याचे आले समोर

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शहरात विविध विकासकामे सुरू आहेत. या कामांचा दर्जा, वेग व नागरिकांच्या तक्रारींची दखल घेवून रविवारी आमदार डॉ. पंकज भोयर यांनी शहराच्या विविध विकास कामांची पाहणी केली. पाहणी दरम्यान आढळून आलेली अनियमितता, कामाचा मंदावलेला वेग व खालावलेला दर्जा पाहुन आमदारांनी अधिकाऱ्यांना कानपिचक्या देत सूचना दिल्या.शहरात राज्य व केंद्र शासनाच्या निधीतून कोट्यावधी रुपयांची विकासकामे सुरू आहेत. या कामांच्या दर्जा व गुणवत्तेबाबत अनेक तक्रारी आ. भोयर यांना प्राप्त झाल्या होत्या. कामे संथगतीने सुरू असून कामाच्या दर्जाबाबत नागरिकांच्या तक्रारींची दखल घेत आज हा पाहणी दौरा करण्यात आला. यावेळी नगराध्यक्ष अतुल तराळे, न.प. उपाध्यक्ष प्रदीपसिंह ठाकूर, बांधकाम सभापती नौशाद शेख, माजी बांधकाम सभापती निलेश किटे, नगरसेवक गोपी त्रिवेदी, यांच्यासह जिल्हा परिषदेचे सदस्य पंकज सायंकार यांची उपस्थिती होती.आ. भोयर यांनी वंजारी चौक ते गजानन सायकल स्टोअर्स, बजाज चौक येथील आचार्य विनोबा भावे उड्डाणपुलाच्या विस्तारीकरणाची पाहणी केली. यावेळी पुलालगत अतिक्रमणासंदर्भात संबंधीत अधिकाऱ्यांची चर्चा करून जाहीर हुसैन कॉलनी व परिसरात जाणाऱ्या पर्यायी मार्गाची चर्चा केली. जुना मार्ग बंद करण्यात येवू नये अशी मागणी यावेळी प्रभागाच्या नगरसेवक व नागरिकांनी केली असता या संदर्भात सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. जिल्हा ग्रंथालयाच्या विस्तारीकरणाची पाहणी करून सदर काम २६ जानेवारी पूर्वी पूर्ण करण्याच्या सूचना केल्या. डॉ. आंबेडकर पुतळा ते बजाज चौक या मार्गालगत होत असलेल्या नाली बांधकाम, बॅचलर रोड येथील आर्वी नाका ते धुनिवाले मार्गावरील रस्ता व नाली बांधकामाची पाहणी करून काही नागरिकांशी चर्चा केली. यात नागरिकांत मतभेद असल्याचे समोर आले. या मार्गावरील अतिक्रमण काढण्याचे निर्देशही त्यांनी दिले.यावेळी वंदना भुते, कैलास राखडे, अभिषेक त्रिवेदी, शुभांगी कोलते, जयंत सालोडकर, सुरेश आहुजा, आशिष वैद्य, निलेश खोंड, सतिश मिसाळ, शरद आडे, सुरेश पट्टेवार, सुमीत गांजरे, बांधकाम विभागाचे उपअभियंता विलास मून, अभियंता हिवरे, चांदोरे, राणे, जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता वाघ, न.प.चे नगर अभियंता सुधीर फरसोले, अभियंता निलेश नंदनवार, सुजीत भोसले, शंकर शेंडे, मनिष सुरजुसे, सचिन होले व नागरिक उपस्थित होते.नाली सरळ करण्याच्या सूचनामुख्य डाकघर चौकात नालीला वळण देण्यात आल्याची बाब नगरसेवकांनी आमदारांच्या निदर्शनास आणून दिली. सदर आडवळण पाहून त्यांनी आश्चर्य व्यक्त करीत अधिकाऱ्यांना शनिवारपर्यंत नाली सरळ करण्याचे निर्देश दिले. भुयारी गटारी योजनेमुळे विकासकामांत मोठा अडथळा निर्माण होत असल्याने जीवन प्राधिकरण, नगर परिषद व बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी बैठक घेवून यावर तोडगा काढावा अशी सूचना आ. भोयर यांनी केली.