शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

एड्सवर कार्यशाळेतून माहिती

By admin | Updated: July 27, 2014 23:55 IST

येथील नोबल शिक्षण संस्था अंतर्गत लिंक वर्कर स्किमचे गावपातळीवरील स्वयंसेवक व रेड रिबन क्लब सदस्य यांची तीन दिवसीय कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी जिल्हा कार्यक्रम अधिकारी शिवा देवगडे,

उपक्रम : स्वयंसेवकांना ग्रामीण भागात जनजागृतीबाबत प्रशिक्षणवर्धा : येथील नोबल शिक्षण संस्था अंतर्गत लिंक वर्कर स्किमचे गावपातळीवरील स्वयंसेवक व रेड रिबन क्लब सदस्य यांची तीन दिवसीय कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी जिल्हा कार्यक्रम अधिकारी शिवा देवगडे, संस्थाध्यक्ष प्रवीण हिवरे, प्रकल्प व्यवस्थापिका प्रतिभा शेंडे, लायनेस क्लब अध्यक्षा सोनाली श्रावणे यांची प्रमुख उपस्थिती होती.यातून स्वयंसेवकांना प्रशिक्षण देण्यात आले. यात गावपातळीवरील स्वयंसेवक व रेड रिबन क्लब सदस्य यांची काय भुमिका असायला पाहिजे, एच.आय.व्ही एड्स या विषयाबाबत जनजागृती करावी, ‘शून्य गाठायचे आहे’ या ब्रिदवाक्यानुसार गाम स्तरावर विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून जागृती करून या आजाराची माहिती पोहचवावी, एच.आय.व्ही.बाधित व्यक्तींबाबत गावपातळीवर असलेला भेदभाव आणि कलंक दूर करुन त्यांचे भावी जीवन भयमुक्त कसे जगता येईल या विषयाबाबत मार्गदर्शन करण्यात आले.या प्रकल्पअंतर्गत निवड केलेल्या शंभर गावांमध्ये उपरोक्त सुविधा लिंक वर्करच्या माध्यमातून मिळणार असल्याने एच.आय.व्ही. एड्स बाबतची माहिती ग्रामीण जनतेपर्यंत सहजपणे पोहचवून झपाट्याने वाढणाऱ्या या आजारावर प्रतिबंध कसा घालता येईल याबाबत शिवा देवगडे यांनी मार्गदर्शन केले. तसेच प्रवीण हिवरे यांनी मार्गदर्शन करताना जिल्हातील निवड केलेल्या शंभर गावात लिंक वर्कर स्किम अंतर्गत संजय गांधी निराधार योजना, रुग्ण कल्याण समिती, आधार कार्ड, बाल संगोपन योजना व राजीव गांधी जीवनदायी योजनेची माहिती देण्याचे आवाहन केले. तसेच शासनाच्या सुविधेचा बाधितांना लाभ मिळवून देण्याकरिता प्रयत्न करण्याचे त्यांनी सांगितले.प्रास्ताविकातून लिंक वर्कर स्किम चे कार्य, कार्यशाळेचा उद्देश याबाबत कार्यक्रम अधिकारी सुचिता बोभाटे यांनी माहिती दिली. कार्यशाळेच्या यशस्वीतेकरिता विजय मानवटकर, प्रवीण पुनवटकर, माया देशमुख, ज्योत्सना ताकसांडे, सुलभा पिसे, संध्या म्हैसकर, लिंक वर्कर आदींनी सहकार्य केले. या कार्यशाळेला जिल्ह्यातील स्वयंसेवक उपस्थित होते.(स्थानिक प्रतिनिधी)