एड्सवर कार्यशाळेतून माहिती
By Admin | Updated: July 27, 2014 23:55 IST2014-07-27T23:55:20+5:302014-07-27T23:55:20+5:30
येथील नोबल शिक्षण संस्था अंतर्गत लिंक वर्कर स्किमचे गावपातळीवरील स्वयंसेवक व रेड रिबन क्लब सदस्य यांची तीन दिवसीय कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी जिल्हा कार्यक्रम अधिकारी शिवा देवगडे,

एड्सवर कार्यशाळेतून माहिती
उपक्रम : स्वयंसेवकांना ग्रामीण भागात जनजागृतीबाबत प्रशिक्षण
वर्धा : येथील नोबल शिक्षण संस्था अंतर्गत लिंक वर्कर स्किमचे गावपातळीवरील स्वयंसेवक व रेड रिबन क्लब सदस्य यांची तीन दिवसीय कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी जिल्हा कार्यक्रम अधिकारी शिवा देवगडे, संस्थाध्यक्ष प्रवीण हिवरे, प्रकल्प व्यवस्थापिका प्रतिभा शेंडे, लायनेस क्लब अध्यक्षा सोनाली श्रावणे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यातून स्वयंसेवकांना प्रशिक्षण देण्यात आले. यात गावपातळीवरील स्वयंसेवक व रेड रिबन क्लब सदस्य यांची काय भुमिका असायला पाहिजे, एच.आय.व्ही एड्स या विषयाबाबत जनजागृती करावी, ‘शून्य गाठायचे आहे’ या ब्रिदवाक्यानुसार गाम स्तरावर विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून जागृती करून या आजाराची माहिती पोहचवावी, एच.आय.व्ही.बाधित व्यक्तींबाबत गावपातळीवर असलेला भेदभाव आणि कलंक दूर करुन त्यांचे भावी जीवन भयमुक्त कसे जगता येईल या विषयाबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
या प्रकल्पअंतर्गत निवड केलेल्या शंभर गावांमध्ये उपरोक्त सुविधा लिंक वर्करच्या माध्यमातून मिळणार असल्याने एच.आय.व्ही. एड्स बाबतची माहिती ग्रामीण जनतेपर्यंत सहजपणे पोहचवून झपाट्याने वाढणाऱ्या या आजारावर प्रतिबंध कसा घालता येईल याबाबत शिवा देवगडे यांनी मार्गदर्शन केले.
तसेच प्रवीण हिवरे यांनी मार्गदर्शन करताना जिल्हातील निवड केलेल्या शंभर गावात लिंक वर्कर स्किम अंतर्गत संजय गांधी निराधार योजना, रुग्ण कल्याण समिती, आधार कार्ड, बाल संगोपन योजना व राजीव गांधी जीवनदायी योजनेची माहिती देण्याचे आवाहन केले. तसेच शासनाच्या सुविधेचा बाधितांना लाभ मिळवून देण्याकरिता प्रयत्न करण्याचे त्यांनी सांगितले.
प्रास्ताविकातून लिंक वर्कर स्किम चे कार्य, कार्यशाळेचा उद्देश याबाबत कार्यक्रम अधिकारी सुचिता बोभाटे यांनी माहिती दिली. कार्यशाळेच्या यशस्वीतेकरिता विजय मानवटकर, प्रवीण पुनवटकर, माया देशमुख, ज्योत्सना ताकसांडे, सुलभा पिसे, संध्या म्हैसकर, लिंक वर्कर आदींनी सहकार्य केले. या कार्यशाळेला जिल्ह्यातील स्वयंसेवक उपस्थित होते.(स्थानिक प्रतिनिधी)