रुग्णसंख्येत वाढ उपाययोजना शून्य
By Admin | Updated: August 12, 2014 23:56 IST2014-08-12T23:56:21+5:302014-08-12T23:56:21+5:30
परिसरात घाणीचे साम्राज्य असल्याने डासांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. यामुळे साथीचे आजार बळावले असून आरोग्य विभाग आणि स्थानिक प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे.

रुग्णसंख्येत वाढ उपाययोजना शून्य
मोझरी (शेकापूर) : परिसरात घाणीचे साम्राज्य असल्याने डासांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. यामुळे साथीचे आजार बळावले असून आरोग्य विभाग आणि स्थानिक प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे.
पावसाळ्याच्या दिवसात साथीचे आजार बळावतात. ग्रामीण भागात रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. येथील परिसरातून आरोग्य केंद्रात उपचाराकरिता रुग्ण येतात. यात मलेरिया, हिवताप या आजारच्या रुग्णसंख्या अधिक आहे. मच्छरांच्या संख्येत वाढ झाली तरी यावर उपाययोजना करण्याचे पाऊल अद्याप आरोग्य प्रशासन आणि स्थानिक प्रशासनाने उचलेले नाही. पावसामुळे ग्रामीण भागातील रस्त्यांवर साचणारे नाल्याचे पाणी व अस्वच्छतेमुळे सर्वत्र डासांची उत्पत्ती वाढली आहे. याचा परिणाम म्हणजे रुग्णसंख्येत होत असलेली वाढ दिसून येते.
मलेरिया, हिवतापाबरोबर डेंग्यूचे लक्षणे असलेले रुग्ण दिसून येत आहे. परंतु आरोग्य विभाग याबाबत कोणतीही माहिती देण्याचे टाळतात. स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाने सुद्धा गावातील स्वच्छतेबाबत जागरुक असणे आवश्यक आहे. परंतु येथील रस्त्यावरुन पाणी वाहत आहे. तर काही भागात नाल्या तुंबलेल्या आहे. परिणामी डासांच्या उत्पतीला वाव मिळत आहे. येथील आरोग्य उपकेंद्रात अत्यल्प सोयी असल्यामुळे रुग्णांना वर्धा, सेवाग्राम येथील रुग्णालयात उपचारार्थ जाण्याशिवाय पर्याय नसतो. यामुळे त्यांना अधिक खर्च येतो. याची दखल घेण्याची मागणी होत आहे.(वार्ताहर)