नैसर्गिक आपत्तींमुळे बालक व स्त्रियांच्या समस्येत वाढ

By Admin | Updated: December 14, 2015 01:56 IST2015-12-14T01:56:02+5:302015-12-14T01:56:02+5:30

जगात सर्वत्र नैसर्गिक आपत्तीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यातून निर्वासितांचा प्रश्न निर्माण होत असून याची सर्वाधिक झळ बालक व स्त्रियांना सोसावी लागत आहे.

Increased child and women's problems due to natural calamities | नैसर्गिक आपत्तींमुळे बालक व स्त्रियांच्या समस्येत वाढ

नैसर्गिक आपत्तींमुळे बालक व स्त्रियांच्या समस्येत वाढ

विजया चौहाण : समाजनिर्मितीत सहभाग वाढावा
दिलीप चव्हाण सेवाग्राम
जगात सर्वत्र नैसर्गिक आपत्तीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यातून निर्वासितांचा प्रश्न निर्माण होत असून याची सर्वाधिक झळ बालक व स्त्रियांना सोसावी लागत आहे. बालकांचे शिक्षण, स्त्रियांचे हक्क व मूलभूत समस्यांच्या निराकरणासाठी युनिसेफ काम करीत आहे. यात स्वच्छता आणि आरोग्य याला तितकेच प्राधान्य दिले जाते, असे मत युनिसेफच्या माजी कार्यक्रम अधिकारी विजया चौहाण यांनी ‘लोकमत’ सोबत संवाद साधताना व्यक्त केले.
नई तालीम येथे परिसंवादानिमित्त त्या आल्या असताना युनिसेफ संस्था व त्याचे कार्य यावर प्रकाश टाकला. जागतिक स्तरावर वंचितासाठी तसेच अविकसित व विकसनशिल राष्ट्रात बालक व स्त्रियांवर होत असलेल्या अत्याचाराला प्रतिबंध करण्यासाठी स्थानिकांच्या माध्यमातून ही संस्था प्रत्यक्ष कार्य करते.
विजया चौहाण या मूळच्या गुजरातमधील! सामाजिक क्षेत्रात कार्य करताना महाराष्ट्र, गोवा येथे त्यांचे वास्तव्य राहिले. त्यामुळे मराठी भाषा त्या अस्खलितपणे बोलतात. राजस्थानमध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या मोठ्या प्रमाणात भेडसावत. पाण्यात सतत नारु आढळत असल्याने नागरिकांत धास्ती होती. त्यांनी नारू निर्मूलनाची मोहीम राबविली. यानंतर त्यांची युनिसेफच्या कार्यक्रम अधिकारी म्हणून निवड झाली. बावीस वर्षात सामाजिक क्षेत्रात कार्य करताना आलेले अनुभव त्यांनी कथन केले.
बालकांकडून शुभेच्छापत्र तयार करुन घेत ही संस्था निधी संकलित करीत असे. स्पर्धेच्या काळात हा उपक्रम मागे पडला. आता जगातील विकसीत राष्ट्र बालक व स्त्रिया यांच्या उद्धारासाठी निधी उभा करतात. मध्य प्रदेश आणि गुजरात राज्यातील सरदार सरोवर प्रकल्पासाठी दिलेल्या जमिनी, त्याचा मोबदला, वंचिताचे प्रश्न, आदिवासी मुलांच्या शिक्षणाचे काम सुरू आहे. नाशिक येथे गरजू मुलांकरिता ‘स्पोर्ट अकॅडमी’ सुरू करण्याचा मानस आहे. समाजातील धनाढ्य व्यक्तींनी सामाजिकतेची भावना जोपासत यात सहभाग दिल्यास चित्र पालटायला वेळ लागणार नाही, असे त्या म्हणाल्या.

ेमानवाच्या अन्न, वस्त्र व निवारा या तीन मूलभूत गरजा आहे; पण युनिसेफचे ध्येय हे बालकांचे मूलभूत हक्क असे आहे. हेच ध्येय बाळगून बालकांच्या विकासाच्या दृष्टीने सर्व सुविधा व सवलती उपलब्ध करून देणे याकरिता युनिसेफच्या माध्यमातून कार्य केले. यानंतर मधून निवृत्त झाले; पण ध्येय स्वस्थ बसू देत नसल्याने देशातील स्थानिक समस्या सोडविण्यात सहभाग घेते.
- विजया चौहाण

Web Title: Increased child and women's problems due to natural calamities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.