शासकीय कामात अडथळा करणाऱ्यांना दंडासह कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2019 06:00 AM2019-10-24T06:00:00+5:302019-10-24T06:00:27+5:30

आरोपी भाऊराव व त्याचे दोन मुले घनश्याम, शुभश्याम, मुलगी अलका व मोहन डफरे सर्व रा. नांदोरा (ड.) ता. देवळी यांनी २३ एप्रिल २०१२ ला सकाळी ११.३० वाजता नांदोरा येथे शासकीय कामात अडथळा निर्माण केला. तक्रारकर्ता महेंद्र राहाटे रा. वर्धा यांच्या मालकीचे शेताची मोजणी पोलीस संरक्षणात शासकीय पद्धतीने सुरू असताना हा प्रकार घडला. आरोपी इतक्यावरच थांबले नाही तर त्यांनी शासकीय कर्मचाऱ्यांना दुखापत पोहोचविली.

Imprisonment with penalties for obstructing government work | शासकीय कामात अडथळा करणाऱ्यांना दंडासह कारावास

शासकीय कामात अडथळा करणाऱ्यांना दंडासह कारावास

googlenewsNext
ठळक मुद्देजिल्हा अतिरिक्त सत्र न्यायालयाचा निकाल

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : शासकीय कामात अडथळा निर्माण करणाऱ्या भाऊराव जामणकर आणि शुभश्याम भाऊराव जामणकर यांना भादंविच्या कलम ३५३ अंतर्गत १ वर्ष कारावास व दंडाची शिक्षा ठोठावली आहे. तर आरोपी घनश्याम याला १ वर्ष सश्रम कारावास व आर्थिक दंडाची शिक्षा जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. एम. मिश्रा यांनी ठोठावली.
प्राप्त माहितीनुसार, आरोपी भाऊराव व त्याचे दोन मुले घनश्याम, शुभश्याम, मुलगी अलका व मोहन डफरे सर्व रा. नांदोरा (ड.) ता. देवळी यांनी २३ एप्रिल २०१२ ला सकाळी ११.३० वाजता नांदोरा येथे शासकीय कामात अडथळा निर्माण केला. तक्रारकर्ता महेंद्र राहाटे रा. वर्धा यांच्या मालकीचे शेताची मोजणी पोलीस संरक्षणात शासकीय पद्धतीने सुरू असताना हा प्रकार घडला. आरोपी इतक्यावरच थांबले नाही तर त्यांनी शासकीय कर्मचाऱ्यांना दुखापत पोहोचविली. शिवाय पोलिसांसमोर आरोपीतांनी तक्रारकर्ता महेंद्र राहाटे याला कुऱ्हाडीने जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी भादंविच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तपासाअंती प्रकरण न्यायप्रविष्ठ करण्यात आले. शुभश्याम याने मारलेल्या कुºहाडीचा मार हुकल्याने तक्रारकर्त्याला कोणतीही जखम झाली नाही. त्यामुळे न्यायालयाने भादंविच्या कलम ३०७ मधून शुभश्यामची तसेच मोहन डफरे यांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. या प्रकरणात १२ साक्षदारांची साक्ष तपासण्यात आली. जखमी जमादार बाबाराव बोरकुटे, डॉक्टरच्या बयाणावरून मारहाण सिद्ध झाल्याने तसेच भाऊराव, घनश्याम व शुभश्याम यांचा गुन्ह्यातील सहभाग सिद्ध झाल्याने न्यायालयाने भाऊराव, घनश्याम यांना १ वर्ष सश्रम कारावास व ५०० रुपये दंड, दंड न भरल्यास १ महिना साध्या कारावासाची शिक्षा सुनावली. तसेच घनश्यामला ३५३ व ३३२ कलमांतर्गत १ वर्षाचा कारावास व ५०० रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. शासकीय बाजू अ‍ॅड. अमोल कोटंबकर यांनी मांडली. शासकीय बाजू मांडणारे अ‍ॅड. अमोल कोटंबकर यांना पैरवी अधिकाऱ्यांनी सहकार्य केले. त्यांच्याच मदतीने साक्षदारांना न्यायालयात हजर करून त्यांची साक्ष तपासण्यात आली.

Web Title: Imprisonment with penalties for obstructing government work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.