पीओपी मूर्तींवर आयातबंदी घाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2020 05:00 IST2020-07-21T05:00:00+5:302020-07-21T05:00:02+5:30

यावर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे चार महिन्यांपासून मातीच्या मूर्ती तयार केल्यात. २२ ऑगस्टरोजी तीन दिवस अगोदर मूर्ती विक्री साठी उपलब्ध असतात. कोरोनाचा धोका लक्षात घेता संघटनेमार्फत संक्रमणापासून बचावासाठी बाजारपेठेत सूचना फलक लावण्यात येणार असून सोशल डिस्टन्सिंग तसेच प्रत्येक स्टॉलवर सॅनिटायझरची व्यवस्था करण्यात येणार आहे.

Impose import ban on POP idols | पीओपी मूर्तींवर आयातबंदी घाला

पीओपी मूर्तींवर आयातबंदी घाला

ठळक मुद्देकुंभार समाजबांधवांची मागणी : नियम पाळून करणार व्यवसाय; प्रशासनाला निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : मागील २५ वर्षांपासून जिल्ह्यातील कुंभार समाज बांधवांकडून मातीच्या पर्यावरणपूरक गणपती, लक्ष्मी इत्यादी मूर्ती तयार केल्या जात असून विक्रीची दुकाने परिसरात उभारली जात आहे. जेणेकरून, नागरिकांना पर्यावरणपूरक वस्तूंची खरेदी करणे सुलभ होऊन त्यांची फसवणूक होणार नाही. बाहेर जिल्ह्यातून प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती आयातबंदीवर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी कुंभार समाजबांधवांनी केली आहे.
यावर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे चार महिन्यांपासून मातीच्या मूर्ती तयार केल्यात. २२ ऑगस्टरोजी तीन दिवस अगोदर मूर्ती विक्री साठी उपलब्ध असतात. कोरोनाचा धोका लक्षात घेता संघटनेमार्फत संक्रमणापासून बचावासाठी बाजारपेठेत सूचना फलक लावण्यात येणार असून सोशल डिस्टन्सिंग तसेच प्रत्येक स्टॉलवर सॅनिटायझरची व्यवस्था करण्यात येणार आहे. प्रशासनामार्फत परिसरात वेळोवेळी निर्जंतुकीकरण तसेच साफसफाई, उपाजयोजना करून देण्यात याव्या, परिसरात ४० ते ५० स्टॉलची गणेश मूर्ती विक्रीसाठी सुविधा संघटनेमार्फत केली जाते. यावर्षी स्टॉलची संख्या कमी-जास्त होण्याची शक्यता आहे. मूती! विक्रीसाठी बाल मंदिर शाळेचे प्रांगण उपलब्ध करून द्यावे, अमरावती, यवतमाळ, अकोला, पेठ इत्यादी ठिकाणांवरून प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींची व्यापारी, दलालांमार्फत आयात केली जाते. चौकात, वॉर्डात कोठेही दुकाने थाटून वाहतुकीला अडथळा तसेच गर्दी निर्माण केली जाते. यावर प्रतिबंध लावण्यात यावा. बाहेर जिल्ह्यातील प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती आयात व विक्रीवर बंदी घालण्यात यावी, आदी मागण्या कुंभार समाजबांधवांनी प्रशासनाला सादर केलेल्या निवेदनातून केल्या आहेत.

पर्यावरणपूरक मूर्र्तींमुळे जलप्रदूषण टाळता येईल
प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती विसर्जनामुळे नदी, ओढे, विहीर आदींतील नैसर्गिक जलस्रोत बंद होत, जल प्रदूषण होते. मूर्र्तींवर असलेल्या रासायनिक रंगांमुळे नदी, धरणातील जलचर प्राणी मृत्युमुखी पडतात. प्रदूषण टाळण्यासाठी नागरिकांनी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती स्थापन करू नये, मातीच्या मूर्र्तींची स्थापना करावी, असे आवाहन पर्यावरणप्रेमींनी केले आहे.

Web Title: Impose import ban on POP idols

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.