शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

कृषी योजना व शेतकरी बचतगटांचे वैरच

By admin | Updated: June 13, 2014 00:24 IST

शेती उत्पादनात वाढ व्हावी, शेतीवर आधारित उद्योगातून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावे यासाठी जिल्ह्यात ‘आत्मा’ अंतर्गत पुरुषांच्या शेतकरी बतचगटाची स्थापना केली गेली; पण बचतगटातील सदस्यांना

देवळी : शेती उत्पादनात वाढ व्हावी, शेतीवर आधारित उद्योगातून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावे यासाठी जिल्ह्यात ‘आत्मा’ अंतर्गत पुरुषांच्या शेतकरी बतचगटाची स्थापना केली गेली; पण बचतगटातील सदस्यांना प्रशिक्षण दिले जात नसल्याने ही योजना कागदोपत्रीच राबविली जाते की काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

कृषी विभागांतर्गत परिसरातील शेतकऱ्यांच्या बचतगटांची नोंदणी करण्यात आली़ तालुका कृषी कार्यालयात आत्मांतर्गत यासाठी कर्मचारी नेमून दिला आहे. त्यांच्याकडे शेतकरी बचतगटांची नोंद असून अध्यक्ष, सचिवांचे भ्रमणध्वनी क्रमांक व गावांचे पत्ते आहेत; पण तालुका कृषी कार्यालयाद्वारे शेतकऱ्यांशी कुठलाही संपर्क केला जात नाही. शेतकऱ्यांनी कृषी विभागाला एखाद्या योजनेबाबत माहिती विचारल्यास तुम्ही कोणती शेती करू शकता, त्याची रितसर माहिती द्या, प्रशिक्षणाच्या वेळी तुम्हाला बोलविले जाईल, असे उत्तर दिले जाते. शेतकरी हुशार असता तर त्यांना कृषी विभागावर अवलंबून राहावे लागले असते काय, हा प्रश्नच आहे़ शेतकऱ्यांना संपर्क करणे आमचे काम नाही. शेतकऱ्यांनी माहिती आम्हाला विचारावी, अशी बेजबाबदार उत्तरे कृषी विभागाकडून दिली जात आहेत़ गत दोन वर्षांपासून बचतगटांसोबत कृषी विभागाचा संपर्कच नाही. केवळ नागपूर येथे विज्ञान प्रदर्शनाकरिता शेतकऱ्यांना ५० रुपये भरून नेण्यात आले होते. शेतकऱ्यांच्या हिताच्या योजनांतर्गत आत्मा या उपक्रमात खर्च केला जात आहे़

शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय करण्याकरिता जिल्ह्यातील प्रगतशील शेतकऱ्यांनी चालविलेले प्रयोग, फळबाग, शेती लागवड, भरपूर प्रमाणात घेतलेले उत्पन्न अशा प्रयोगशील शेतकऱ्यांच्या भेटी घडवून आणणे, त्यांनी नियोजन कसे केले याबाबत माहिती देणे आदी कामे करणे अपेक्षित आहे; पण कृषी विभागाने या परिसरातील शेतकऱ्यांना मार्गदर्शनच केले नाही. उलट या विभागाशी संपर्क साधला असता तुम्हाला कशाची आवश्यकता आहे, कोणते प्रशिक्षण घ्यायचे आहे, रेमीम, फळबाग, दुग्ध व्यवसाय याबाबत शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष कृषी विभागात संपर्क साधावा, असे सूचविले जाते़ यावरून कृषी विभाग शेतकऱ्यांच्या हिताकरिता किती तत्पर आहे, हे दिसून येते़ जिल्ह्यात बोगस बियाणे जप्त करण्यात आले आहे. या बियाण्यांबद्दलही कृषी विभागाने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे गजरेचे आहे. कृषी विभागाच्या योजना पुरुष बचतगटापर्यंत कशा पोहोचतील व आत्मांतर्गत शेतकऱ्यांना कसा लाभ होईल, याकडे वरिष्ठांनी लक्ष द्यावे, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे़(प्रतिनिधी)