शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

वणा नदीपात्रात अवैधरीत्या वाळू उपसा, पाच ट्रॅक्टरसह दोन जेसीबी केलेय जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2024 16:53 IST

समुद्रपूर तालुक्यातील प्रकार : स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, ८५ लाखांचा मुद्देमाल

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : समुद्रपूर तालुक्यातील वणा नदीच्या पात्रात अवैधरीत्या वाळू उपसा सुरू होता. स्थानिक गुन्हे शाखेला माहिती मिळताच त्यांच्या पथकाने धाड टाकून पाच ट्रॅक्टरसह दोन जेसीबी, असा एकूण ८५ लाख २५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई मंगळवारी पहाटेच्या सुमारास करण्यात आली. या कारवाईमुळे या तालुक्यातील वाळू चोरट्यांचे धाबे दणाणले आहे.

स्थानिक गुन्हे शाखेची चमू हिंगणघाट उपविभागात गस्तीवर असताना त्यांना समुद्रपूर परिसरातील वणा नदीच्या पात्रातून वाळूचे अवैध उत्खनन व वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे नदीपात्रात पाहणी केली असता, दोन जेसीबींच्या साहाय्याने अवैध उत्खनन करून पाच ट्रॅक्टरच्या साहाय्याने वाळू वाहतूक होत असल्याने निदर्शनास आले. पाच ट्रॅक्टर चालकांना वाळू वाहतुकीचा परवाना विचारला असता, त्यांच्याकडे कोणताही परवाना नसल्याने त्यांच्याकडील वाहने जप्त करण्यात आली. पाच ट्रॅक्टर, दोन जेसीबी व ५०० ब्रास वाळू, असा एकूण ८५ लाख २५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी समुद्रपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. 

ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विनोद चौधरी, पोलिस उपनिरीक्षक सलाम कुरेशी, पोलिस अंमलदार हमीद शेख, नरेंद्र पाराशर, श्रीकांत खडसे, सचिन इंगोले, राजेश तिवसकर, रवी पुरोहित, प्रमोद पिसे, रामकिसन इप्पर, नितीन इटकरे, सागर भोसले व उदय सोळुंके आदींनी केली.

तालुका प्रशासनाच्या डोळ्यावर पट्टीसमुद्रपूर तालुक्यातील वणा नदीच्या पात्रात गेल्या अनेक दिवसांपासून अवैधरित्या वाळू उपसा सुरु आहे. याकडे स्थानिक महसूल विभाग व पोलिस प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याने वाळू चोरट्यांची चांगलीच हिंमत वाढली. • निवडणूक काळात प्रशासन व्यस्त असताना या वाळू चोरट्यांनी याचाच फायदा घेते वारेमाप वाळूचा उपसा केला. आताही तोच प्रकार सुरु असताना तालुका प्रशासनाकडून अर्थपूर्ण पाठबळ मिळत असल्याने कारवाईकडे कानाडोळा केला जात होता, असे मंगळवारी झालेल्या कारवाईवरुन दिसून आले.

या वाळ चोरट्यांविरुद्ध समुद्रपुरात गुन्हा दाखलपोलिसांनी जेसीबी चालक गजानन छगन तामसवाडे (३०, रा. ब्राह्मणी), श्रावण रामचंद सिडाम (३२, रा. हरणखुरी) तसेच ट्रॅक्टर चालक यशवंत परसराम दाते (४३, रा. कांडळी), अरविंद अशोक कोटनाके (३०, रा. रामनगर), अमोल गोविंद डोमकावळे (२८, रा. कांडळी), आकाश भाऊराव कन्नाके (२९, रा. हरणखुरी) यांना ताब्यात घेण्यात आले. तर जेसीबी व ट्रॅक्टर मालक प्रशांत देवराव चौधरी (३०, रा. निरगुडी) महादेव वांदिले (रा. कांडळी) व युवराज कारमोरे (रा. कांडळी) हे तिघेही फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

टॅग्स :sandवाळूmafiaमाफियाwardha-pcवर्धाCrime Newsगुन्हेगारी