शहरात माफियांचे अवैध वाळूघाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2019 05:00 IST2019-12-25T05:00:00+5:302019-12-25T05:00:13+5:30
सावंगी, पिपरी यासह शहरालगतच्या परिसरात सर्वाधिक साठे दिसतात. माफियांनी खुले ले-आऊट, अतिक्रमित जागा, हायवेलगतचा परिसर अशा ठिकाणी वाळूचे साठे केले आहे. यानंतरही तहसील प्रशासन गप्प आहे. जिल्हा मुख्यालयाचे ठिकाण असलेल्या वर्ध्यात महसूल प्रशासनाच्या नाकावर टिच्चून माफियांनी साठे ठेवले आहे. शहराच्या भोवताल माफियांचे जाळे पहायला मिळत आहे. ज्या ठिकाणी वाळूसाठे ठेवण्यात आले, त्या ठिकाणी सर्वसामान्याला पोहोचता येत नाही. खुले ले-आऊट, बेवारस जागांवर असे साठे ठेवण्यात आले आहे.

शहरात माफियांचे अवैध वाळूघाट
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : नवीन जलधोरणामुळे वाळूउपशावर बंदी आहे. वाळूघाटांचा लिलाव थांबला आहे. याचा फायदा घेत वाळूमाफियांनी वाळूघाटावर मिळणार नाही इतका साठा वर्धा शहराच्या चारही बाजूंनी केला आहे. जणू कृत्रिम वाळूघाट तयार केल्याचे चित्र पहावयास मिळते. याकडे महसूल प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष असल्याचे दिसून येते. वाळूसाठ्याबाबत स्पष्ट शासन आदेश असतानाही कारवाई होत नाही.
सावंगी, पिपरी यासह शहरालगतच्या परिसरात सर्वाधिक साठे दिसतात. माफियांनी खुले ले-आऊट, अतिक्रमित जागा, हायवेलगतचा परिसर अशा ठिकाणी वाळूचे साठे केले आहे. यानंतरही तहसील प्रशासन गप्प आहे. जिल्हा मुख्यालयाचे ठिकाण असलेल्या वर्ध्यात महसूल प्रशासनाच्या नाकावर टिच्चून माफियांनी साठे ठेवले आहे. शहराच्या भोवताल माफियांचे जाळे पहायला मिळत आहे. ज्या ठिकाणी वाळूसाठे ठेवण्यात आले, त्या ठिकाणी सर्वसामान्याला पोहोचता येत नाही. खुले ले-आऊट, बेवारस जागांवर असे साठे ठेवण्यात आले आहे. यामुळे कारवाई झाली तरी ही आमची वाळू नाही, असे म्हणण्यासाठी माफिया मोकळे राहणार आहे.
तहसील प्रशासनाने खुल्या जागेवरील सर्व वाळूचे साठे जप्त करण्याची गरज आहे. मात्र, प्रशासनाने अद्यापही कारवाई केली नाही. विशेष म्हणजे, सावंगी परिसरात आणि पिपरी भागातही वाळूचे साठे आहे. बायपासला लागून चौफुलीजवळ मोठा वाळूचा साठा आहे. दिवसाढवळ्या या ठिकाणावरून वाळू वाहनांमध्ये भरली जाते. शहरातील ‘ओपन स्पेस’ आणि शासकीय जागांवर अनेक ठिकाणी वाळूसाठे ठेवण्यात आले आहे. तर काही भागात वाळूचा उपसा करणाऱ्या बोटही खुलेआम ठेवण्यात आल्यात. याची माहिती महसूल विभागाला असताना कारवाई होत नाही, हे आश्चर्य.
यशोदेच्या पात्रातून वाळूचोरी
टाकळी (चणाजी) यथील यशोदा न दी व नाल्याच्या पात्रातून मोठ्या प्रमाणात अवैधरीत्या वाळूचा उपसा केला जात असून यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे. हा प्रकार अधिकाऱ्यांच्या लागेबांध्यातूनच होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. रविवारी मध्यरात्री टाकळी (चणाजी) येथील कबड्डी मैदानावर मोठ्या प्रमाणात वाळूचा साठा करण्यात आला. हा वाळूसाठा कुणाचा असा प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. तसेच रविवारच्या रात्रीच सोनेगाव (बाई) येथील नाल्यातून जेसीबीच्या सहाय्याने वाळूचा उपसा करण्यात आला. यात देवळीतील झोरे नामक व्यक्तीचे नाव पुढे आले आहे.
महसूल विभागातूनच कारवाईची खबर
बंदीच्या काळात वाळूमाफियांचा मुक्त संचार सुरू आहे. या माफियांसोबत स्थानिक महसूल यंत्रणेतील एका महाभागाने आपली भागीदारी केली आहे. त्यामुळे कारवाईसंदर्भात कुठलीही हालचाल यंत्रणेकडून होत असेल तर याची पूर्वसूचना सोईस्करपणे आपल्या भागीदार वाळूमाफियांना दिली जाते. काही दिवसांपूर्वी वर्धा तालुक्याबाहेरील वाळू ट्रकवर कारवाई झाली. त्यातही मापात पाप करीत आपल्या जवळच्या ट्रकला कमी दंड तर इतरांवर दाम दुप्पट दंड आकारले. हा प्रकार वरिष्ठांच्या डोळ्यात धूळफेक करून सुरू आहे.