शहरं
Join us  
Trending Stories
1
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
2
Top Marathi News LIVE Updates: मस्साजोगच्या पोटनिवडणुकीत धक्कादायक निकाल; अश्विनी देशमुख पराभूत
3
Video - EVM मध्ये बिघाड झाल्याने मतदार संतापले; भाजपा नेत्यावर हल्ला, केला लाठीचार्ज
4
पंजाबविरुद्धच्या लढतीदरम्यान ड्रेसिंग रूमध्येच केलं स्मोकिंग, रियान पराग अडचणीत, व्हिडीओ व्हायरल
5
अनिल अंबानींच्या ३०३४ कोटींच्या संपत्तीवर टाच; फ्लॅटपासून ते फार्महाऊस पर्यंत काय काय जप्त?
6
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नेमकं काय प्यायला द्यायचा?
7
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, सेन्सेक्स ३५० अंकांनी, तर निफ्टी १०० अंकांनी वधारला, 'या' शेअर्सवर आज नजर
8
ओपेक'मध्ये फूट! सौदीशी पंगा आणि इराणचा धोका; संयुक्त अरब अमिरातीने का सोडली जगाची 'तेल संघटना'?
9
PSL 2026: बाबर आझमचे वादळी शतक! तब्बल ७ वर्षांनी केला पुन्हा 'तो' पराक्रम; संघही फायनलमध्ये
10
उष्णतेचा दुहेरी तडाखा! दिवस आणि रात्रीही लाहीलाही; हवामान विभागाने दिला मोठा इशारा
11
डिजिटल पेमेंट, ट्रान्झॅक्शन, म्युच्युअल फंड.., १ मे पासून काय काय बदलणार? तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
12
मतदार छाननीत गडचिरोलीची आघाडी; मुंबईसह पुणे, ठाणे, नागपूर पिछाडीवर
13
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
14
उन्हामुळे शरीराचे ‘हे’ तीन अवयव होऊ शकतात निकामी; डॉक्टरांनी दिले ६ खास सल्ले, जाणून घ्या
15
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
16
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
17
पाणी येताच दारी, ‘लक्ष्मी’ आली घरी! दुर्गम सातपुड्यातील नागझरीमधील हाऱ्यापाड्यावरची अनोखी ‘जलकहाणी’
18
जर्मनीत अंतराळवीरांना १०० दिवसांचा एकांतवास! त्यांनी काही मोठा गुन्हा केला आहे का?
19
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
20
बापरे, हा काय प्रकार! हाय हिल्स घालून अक्षय कुमारचा 'लालपरी' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

वितरिकांच्या सफाईकडे दुर्लक्ष

By admin | Updated: November 15, 2014 01:59 IST

बोर प्रकल्पांतर्गत येणाऱ्या वितरिका व पाटसऱ्यांची साफसफाई केली नसताना रब्बी हंगामासाठी सोडलेल्या पाण्यामुळे शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागला आहे़

घोराड : बोर प्रकल्पांतर्गत येणाऱ्या वितरिका व पाटसऱ्यांची साफसफाई केली नसताना रब्बी हंगामासाठी सोडलेल्या पाण्यामुळे शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागला आहे़ संबंधित विभागाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने परिसरातील शेतकरी संताप व्यक्त होत आहे.२४८ कि़मी़ च्या असलेल्या वितरिकांमध्ये मोठमोठी झाडेझुडपे वाढली आहे. सायपनची दुरूस्तीही करण्यात आली नाही. वितरिकांची गाळामुळे झालेले खोलीकरण करण्यातही पाटबंधारे विभागाने कर्तव्यदक्षता दाखविली नाही. प्रत्येकाच्या शेतापर्यंत जाणाऱ्या पाटसऱ्या कित्येक वर्षापासून दुरूस्तीच्या प्रतिक्षेत असताना आपल्या शेतात पाणी पाझरून पिकांची हानी होऊ नये याची काळजी शेतकऱ्यांनाच घ्यावी लागत आहे़पांदण रस्त्याला आडव्या गेलेल्या पाटसऱ्यांवरील सिमेंटच्या पायल्या गत काही वर्षापासून फुटल्या असल्याने बहुतांश ठिकाणी कसरत करावी लागत आहे़ ५० वर्षाच्या झालेल्या बोरप्रकल्पाच्या वितरिका, सायपन, पाटसऱ्याची कायम स्वरूपी दुरूस्ती आदींकडे कुणीही पाठपुरावा केला नसल्याने कर्मचाऱ्यांची कमतरता हे कारण पुढे करून रात्र व दिवस पाळीत पाण्याचे नियोजन योग्य रितीने होण्यास कुणीही कर्मचारी वितरिकेवर फिरकत नाही़१२ नोव्हेंबरला रब्बी हंगामाच्या ओलितासाठी बोर प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरू झाला असून कंत्राटी व रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या भरवश्यावर आता देखरेखीची मदार येणार असल्याचे सांगितले जात आहे़ काही ठिकाणी जेसीबीच्या सहाय्याने कामे केली असली तरी ती पूर्णपणे करण्यात आली नसल्याची ओरड आहे़गत काही वर्षांअगोदर प्रत्येक वितरिकेवर शेतकऱ्यांमधून पाणी वापर संस्था स्थापन करण्यात आल्या होत्या़ एक दोन वर्ष या संस्थानी उत्तमरित्या वितरिकांची साफसफाई करून पाणी नियोजन केले. मोठ्या प्रमाणात होणारा पाण्याचा अपव्यय रोखण्यात यशही आले. या संस्थांना कामासाठी निधी दिला जात होता़ पण काही वर्षापासून या पाणी वापर संस्था नावालाच राहिल्या आहे़ त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होत असून नदी नाल्याला पाण्याचा ओघ वाढत आहे़शेतकऱ्यांनी तक्रार केल्यानंतरही तक्रारीची दखल घेण्यासाठी तक्रारदाराला प्रतीक्षा करावी लागत असल्याचे त्रस्त शेतकरी गुणवंत राऊत यांनी सांगितले़ रबी हंगाम सुरू असून ओलितासाठी पाण्याची अत्यंत गरज आहे. तरंतु पाटसऱ्या फुटल्याने शेतकरी वर्गाला पाहिजे त्या प्रमाणात पाणी मिळत नाही. त्यामुळे पाटबंधारे विभागाने याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.(वार्ताहर)