बाहेर फिराल तर फटके खाल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2020 06:00 AM2020-03-26T06:00:00+5:302020-03-26T06:00:09+5:30

राज्यात कोरोनाच्या रुग्णांनी शंभरी गाठली तर देशत पाचशे पेक्षा अधीक्ष रुग्ण झाले आहेत. त्यामुळे भारतासह राज्यातील स्थिती गंभीर असल्याने राज्य सरकारने सोमवारपासून कलम १४४ संचारबंदी लागू केली. परिस्थिती गंभीर होत असताना शहरात काही ठिकाणी विनाकारण फिरणाऱ्यांना पकडण्याची मोहीम हाती घेतली आहे.

If you walk out, you will get hit! | बाहेर फिराल तर फटके खाल!

बाहेर फिराल तर फटके खाल!

Next
ठळक मुद्देदुर्लक्षितपणा : किराणा, भाजीपाला खरेदीसाठी अधिकचा जमाव

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : वर्धा जिल्ह्यात कलम १४४ अंतर्गत जमावबंदी करण्यात आली असून संचारबंदीही लागू करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना रस्त्यावर फिरता येणार नाही. यास्थितीत आरोग्य, अन्नपदार्थ तसेच भाजीपाला औषधे विक्री करण्यास परवानगी दिलेली आहे. मात्र, याच गोष्टींचे कारणे दाखवत जिल्हाभरात कायद्याचे उल्लंघन होत आहे. दरम्यान नागरिकांनी जमावबंदी आदेशाचे पालन करावे, अन्यथा बाहेर विनाकारण फिरताना दिसल्यास पोलिसांचे फटके बसतील, असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.
राज्यात कोरोनाच्या रुग्णांनी शंभरी गाठली तर देशत पाचशे पेक्षा अधीक्ष रुग्ण झाले आहेत. त्यामुळे भारतासह राज्यातील स्थिती गंभीर असल्याने राज्य सरकारने सोमवारपासून कलम १४४ संचारबंदी लागू केली. परिस्थिती गंभीर होत असताना शहरात काही ठिकाणी विनाकारण फिरणाऱ्यांना पकडण्याची मोहीम हाती घेतली आहे.
वर्धेकरांनी जनता कर्फ्यूला प्रतिसाद दिला. मात्र, दुसऱ्या दिवसापासून विनाकारण गर्दी करणाऱ्यांनी पुन्हा डोकेवर काढले आहे. वर्ध्यातील पावडेचौक, आर्वीनाका, शिवाजी चौक ते बजाज चौकाकडे जाणाऱ्या मार्गावरुन दुचाकीस्वार विनाकारण फिरताना दिसून येत आहे. त्यामुळे पोलीस यंत्रणेने कठोर पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे.

कारवाईसाठी पोलिसांची नाकाबंदी
विनाकारण शहरात फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी पोलिसांनी शहरातील विविध भागांमध्ये नाकाबंदी केली आहे. त्या ठिकाणाहून जाणाऱ्या चारचाकी, दुचाकी वाहन चालकांना हटकून फिरण्याचे कारण विचारले जात आहे. यात अनेकजण काहीही कारण नसताना फिरताना दिसल्यास त्यांना प्रसादही देण्यात येत आहे.

विक्रेत्यांकडून काळजीची पूर्व व्यवस्था नाही
किराणा दुकानदार, भाजीपाला विक्रेते फळ विक्रेत्यांची दुकाने सुरू ठेवण्याबाबत परवानगी देण्यात आली आहे. परवानगी मिळाली असली तरी विक्रेत्यांकडून कोणतीही खबरदारी घेतली जात नसल्याची बाब समोर आली आहे. कोणत्याही विक्रेत्याच्या हातात ग्लब्स नाही. तोंडाला मास्क नाही. शिवाय कोणत्याही प्रकारचे सॅनिटायझर उपलब्ध नाही अशी स्थिती बाजारात पहावयास मिळत आहे.

Web Title: If you walk out, you will get hit!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.