रेल्वेत जास्तीचे सामान न्याल तर भरावा लागेल दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2022 05:00 IST2022-06-09T05:00:00+5:302022-06-09T05:00:11+5:30
विमानाप्रमाणेच आता रेल्वेतूनही आता सामान नेण्यावर मर्यादा आणल्या आहेत, तसेच ज्वलनशील पदार्थांची वाहतूक करण्यास मनाई करण्यात आली आहे. रेल्वेने नुकतेच याबाबतचे नियम जारी केले असून, सक्तीने नियमांची अंमलबजावणी केली जाणार असल्याची माहिती आहे, तसेच नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार आहे.

रेल्वेत जास्तीचे सामान न्याल तर भरावा लागेल दंड
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : रेल्वे प्रवास करताना अनेकांकडे कित्येक बॅगा दिसतात. कोणी गावाहून धान्याची पोती आणतो, तर कुणी फळांच्या पेट्या, इतकंच काय तर गॅस सिलिंडर, ज्वलनशील रसायने, फटाके आदी वस्तू घेऊन अनेक जण रेल्वेने प्रवास करतात; मात्र आता रेल्वेतून सामान नेणाऱ्यांवर मर्यादा आणली असून, जास्तीचे सामान नेल्यास सहा पट दंड भरावा लागणार आहे. विमानाप्रमाणेच आता रेल्वेतूनही आता सामान नेण्यावर मर्यादा आणल्या आहेत, तसेच ज्वलनशील पदार्थांची वाहतूक करण्यास मनाई करण्यात आली आहे. रेल्वेने नुकतेच याबाबतचे नियम जारी केले असून, सक्तीने नियमांची अंमलबजावणी केली जाणार असल्याची माहिती आहे, तसेच नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार आहे.
जास्तीच्या सामानासाठी मोजावे लागणार पैसे
- रेल्वेने जर जास्तीचे सामान घेऊन जायचे असल्यास काउंटरवर आधी जास्तीच्या सामानासाठी पैसे मोजावे लागणार आहे.
- जर निर्धारित किलोच्या वर सामान आढळून आल्यास त्याच्यावर अतिरिक्त दंडाचा भार येणार आहे, हे मात्र तितकेच खरे.
अन्यथा भरावा लागेल प्रवाशांना दंड
एखादा प्रवासी ४० किलोपेक्षा जास्त सामान घेऊन ५०० किमीपेक्षा जास्त अंतराचा प्रवास करीत असल्यास १०९ रुपये लगेज फी भरावी लागेल; मात्र हे शुल्क न भरता सामानासह प्रवास करताना पकडल्यास ‘लगेज फी’च्या सहा पट म्हणजेच तब्बल ६५० रुपये दंड आकारल्या जाऊ शकतो.
४० किलाे स्लीपर क्लाससाठी
नव्या नियमानुसार आता ट्रेनमधून प्रवास करताना प्रवाशांना जर ४० किलो सामानासह प्रवाशांना स्लीपर क्लासमधून प्रवास करता येणार आहे. यापेक्षा जास्त सामान आढळून आल्यास कारवाई केली जाणार आहे.
५०किलो २ टायर एसीसाठी
एसी टू टायरमधून प्रवास करताना अनेक जण जादाचे सामान घेऊन जात होते; मात्र आता २ टायर एसीमधून प्रवास करायचा असल्यास प्रवाशाला ५० किलो सामान सोबत नेता येणार आहे, हे मात्र तितकेच खरे.