शहरं
Join us  
Trending Stories
1
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाचत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
2
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
3
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
4
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
5
Mohammad Nabi Fastest Fifty : एका षटकात ५ षटकार! युवीचा विक्रम आला होता धोक्यात, पण...
6
पालघर-डहाणूत ठाकरे गटाला खिंडार; सरपंच-उपसरपंच-पदाधिकारी शिवसेनेत, एकनाथ शिंदे म्हणाले...
7
Nuwan Thushara Unplayable Delivery : 'बेबी मलिंगा'ची कमाल! लेगला चेंडू टाकत उडवली ऑफ स्टंप (VIDEO)
8
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
9
स्कॉर्पिओ, सेल्टोस अन् हॅरियरचीही ‘बोलती बंद’; लोकांनी या ढासू SUV वर लाखो रुपये केले खर्च! 
10
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
11
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
12
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
13
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
14
तज्ज्ञांचा इशारा...! ‘या’ बँकेचा स्टॉक 17 रुपयांपर्यंत कोसळणार, गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढले; SBI सह अनेक दिग्गजांनी शेअर विकले
15
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
16
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढा ! सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमुक्ती करा
17
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
18
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
19
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
20
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस

थकवा, चिडचिड वाढली असेल तर लगेच करा हिमोग्लोबिन तपासणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2025 17:00 IST

Vardha : ३५ हजार जणांनी केली तपासणी

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : महिलांमध्ये साधारणपणे डी व्हिटॅमिन, कॅल्शियम, बी १२ आणि लोह, तसेच हिमोग्लोबिन यांची कमतरता असल्याचे दिसून येत आहे. लोह हे शरीरातले सर्वात महत्त्वाचे खनिज असते. शरीरात लोह आणि हिमोग्लोबिनची कमतरता असेल, तर बऱ्याच समस्या भेडसावतात. याकडे दुर्लक्ष केल्यास गंभीर परिणाम दिसून येत असल्याने महिलांनी तातडीने रक्ताची तपासणी करावे, असे आवाहन जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

लोह आणि हिमोग्लोबिन हे घटक एकमेकांशी कनेक्टेड असल्याने दोघांचे शरीरातील प्रमाण योग्य असणे आवश्यक असते. मात्र, हिमोग्लोबिन कमी असेल, तर आपल्याला आरोग्याशी निगडीत विविध समस्या उद्भवतात. संपूर्ण शरीराला ऑक्सिजन पोहोचवण्याचे काम हिमोग्लोबिन करत असते. मात्र, ते न मिळाल्यास सततचा थकवा, चिडचिड, निस्तेजपणा, जीव घाबरल्यासारखे होणे अशा समस्या निर्माण होतात. आपल्या शरीरात कमतरता आहे हे वेळीच लक्षात आले, तर त्यावर उपचार करणे सोपे होते. 

घाबरल्यासारखे होणे शरीरात लोह कमी असेल, तर हिमोग्लोबीनही कमी असण्याचीच शक्यता जास्त असते. अशावेळी हृदयाला श्वास घेण्यासाठी नेहमीपेक्षा जास्त कष्ट घ्यावे लागतात. यामुळे हृदयाच्या ठोक्यांची गती वाढते आणि जीव घाबरल्यासारखे होते. हे लक्षण बराच वेळ जाणवत असेल आणि आपण त्याकडे दुर्लक्ष केले, तर हृदयावर ताण येतो आणि कार्यात अडथळा निर्माण होतो.

श्वास कमी पडणे हिमोग्लोबिन कमी झाले की, शरीराला ऑक्सिजन पुरवण्याचे काम कमी होते. दम लागल्यासारखे किंवा श्वास कमी पडल्यासारखे व्हायला लागते. हे हिमोग्लोबिन कमी झाल्याचे लक्षण आहे, हे वेळीच ओळखायला हवे.

अनेकदा थकवा जास्त येणे अनेकदा तरुण मुलींना किंवा महिलांना सतत थकवा आल्यासारखे वाटते. काहीच न करता पडून राहावेसे वाटते. अशावेळी इतर कोणतीही लक्षणे नसल्याने काम टाळल्या जाते. मात्र, रक्तातील हिमोग्लोबिन आणि लोहाची पातळी कमी असल्यास बराच थकवा येण्याची शक्यता असते. त्यामुळे तपासणी करणे आवश्यक आहे.

त्वचा निस्तेज होणे अन् केस गळण्याची समस्या आपली त्वचा एकाएकी निस्तेज व्हायला लागते. तसेच, केसही मोठ्या प्रमाणात गळायला लागतात आणि पातळ होतात. अशावेळी त्वचा आणि केसांच्या समस्येने सौंदर्यात बाधा येत असल्याने आपण टेन्शनमध्ये येतो. पण, रक्तातील हिमोग्लोबिन, लोह कमी असते.

तपासणी दरम्यान रुग्णाच्या रक्तात नेमके काय आढळले?

  • अनेक महिला व पुरुषांच्या शरीरात लोह आणि हिमोहग्लोबीनची कमतरता आढळून आली.
  • यामुळे शरीरात शुगरचे प्रमाण वाढल्याचे दिसून आले. दरम्यान त्यांना शुगर कमी करण्यासाठी मोफत औषधोपचार सुरू केले आहे. 
  • सर्दी व खोकल्याचा त्रास असलेल्या संशयीत रुग्णांचे एक्सरे काढण्यात आले असून, क्षयरोगाबाबतही तपासणी केली आहे.

३५ हजार जणांनी केली हिमोग्लोबीन तपासणी जिल्हा रुग्णालयात एप्रिल २०२४ ते आतापर्यंत ३५ हजार ५५२ जणांनी हिमोग्लोबीनची तपासणी केली. यात ७ एमजीपेक्षा कमी हिमोग्लोबीन असलेल्या १४८६ रुग्णांना मोफत औषधोपचार दिला जात आहे. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्यwardha-acवर्धा