लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्या गौरी लंकेश यांची बंगळुरु येथील त्यांच्या राहत्या घरी अज्ञात इसमांनी गोळ्या झाडून हत्या केली. ही हत्या म्हणजे पुरोगामी विचारांवर प्रहार असून आरोपींना त्वरित अटक करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसने केली आहे. रायुकॉ प्रदेश उपाध्यक्ष समीर देशमुख व पदाधिकारी उपस्थित होते.रायुकॉच्यावतीने गौरी लंकेश यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. श्रद्धांजली अर्पण करताना समीर देशमुख म्हणाले दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी यानंतर निर्भिडपणे लिहीणाºया गौरी लंकेश यांची हत्या होणे हे धर्मनिरपेक्ष राष्ट्राला काळीमा फासणारी घटना आहे. हत्या केल्याने व्यक्ती संपतो मात्र विचार संपत नाही हे हत्या करणाºयांना माहित नसावे. गांधीजीची हत्या करण्यात आली मात्र विचार संपले नाहीत आणि संपणार नाही. एकसंघ राष्ट्राचा विचार देणारे, दिशा देणारे थोरपुरुष होवून गेलेत मात्र त्यांचे विचार अजरामर राहतील. गौरी लंकेश यानी धर्माध शक्तीविरुद्ध आवाज उठविला. त्यांची हत्या करणाºयांचा सरकारने त्वरीत छडा लावून आरोपींना कठोर शिक्षा करावी असे मत व्यक्तयाप्रसंगी रायुकॉ जिल्हाध्यक्ष संदीप किटे, राकॉ सरचिटणीस अजीत ठाकरे, राविकॉ अध्यक्ष राहुल घोडे, अजय जानवे, विनय मुन, मंगेश भोमले, संकेत निस्ताणे, विक्की खडसे, प्रणय राऊत, योगेश घोगरे, संदीप ठाकरे, गुरुदेव मसराम, नयन खंगार, मंगेश गांवडे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.विविध महिला संघटनांनी नोंदविला निषेधवर्धा - ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या मारेकºयांना तातडीने अटक करुन कठोर शिक्षा करण्यात यावी याबाबत विविध महिला संघटनांनी जिल्हाधिकाºयांना निवेदन दिले. तसेच या घटनेचा निषेध नोंदविला. विषमतावादी व्यवस्थेच्या विरुद्ध बोलण्याचा, लिहिण्याचा अधिकार जर नाकारल्या जात असेल तर ही अत्यंत घृणास्पद बाब आहे. या आधीही डॉ. नरेंद्र दाभोळकर, कलबुर्गी, पानसरे या विचारवंतांची हत्या करण्यात आली.या हत्यांचा अद्याप तपास लागला नाही. शासन मात्र अजूनही मूग गिळून आहे. अशा शब्दात निषेध व्यक्त केला. निवेदन देताना प्रा. सुचिता ठाकरे, सुनीता इथापे, विद्या राईकवार,अल्का भुगूल, योगिता मानकर, वर्षा बोकाडे, संगीता इंगळे, मिनल इथापे, सुचिता ठाकरे, नंदिनी बर्वे, प्रतिभा वाळके, मुक्ता शंभरकर,वैजू मून, मंजूषा चौगावकर, वंदना झामरे, ज्योती मून, करुणा शंभरकर, नलू शंभरकर, अरुणा माटे आदी महिला उपस्थित होत्या.
हत्या केल्याने विचार संपत नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2017 22:27 IST
पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्या गौरी लंकेश यांची बंगळुरु येथील त्यांच्या राहत्या घरी अज्ञात इसमांनी गोळ्या झाडून हत्या केली.
हत्या केल्याने विचार संपत नाही
ठळक मुद्देगौरी लंकेश यांना रायुकाँची श्रद्धांजली : हत्येचा तपास तातडीने करण्याची मागणी