घराला आग; दीड लाखाचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2019 21:47 IST2019-04-02T21:46:43+5:302019-04-02T21:47:10+5:30
सेलू तालुक्यातील आलगाव येथे घराला अचानक आग लागली. ही घटना मंगळवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली. सदर घटनेमुळे उमेश मनोहर मडावी यांचे सुमारे दीड लाखांचे नुकसान झाले आहे.

घराला आग; दीड लाखाचे नुकसान
आलगाव येथील घटना
घोराड : सेलू तालुक्यातील आलगाव येथे घराला अचानक आग लागली. ही घटना मंगळवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली. सदर घटनेमुळे उमेश मनोहर मडावी यांचे सुमारे दीड लाखांचे नुकसान झाले आहे.
प्राप्त माहितीनुसार, उमेश मनोहर मडावी व त्यांचे कुटुंबिय घरी हजर असता अचानक आग लागल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. दरम्यान आरडा-ओरड झाल्याने परिसरात नागरिकांनीही घटनास्थळाकडे धाव घेतली. शिवाय नजीकच्या शेतातील कृषीपंप सुरू करून आगीवर पाण्याचा मारा करण्यात आला. सुमारे एक तासांच्या प्रयत्नाअंती नागरिकांना आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले.
यात मडावी यांच्या घरातील कपडे, दागिणे आणि संसारउपयोगी साहित्य जळाल्याने त्यांचे सुमारे दीड लाखांचे नुकसान झाले आहे. माहिती मिळताच ग्रा.पं.चे सचिव, तलाठी यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. सदर आग शॉट सर्कीटमुळे लागली असावी असा अंदाज वर्तविला जात आहे.