उम्मीदो वाली ग्रूव्ह, सनशाईन वाली आशा

By Admin | Updated: August 4, 2014 23:53 IST2014-08-04T23:53:07+5:302014-08-04T23:53:07+5:30

शासनाने स्त्री शिक्षणाची आवश्यकता ओळखून मुली शिक्षित व्हाव्या, यासाठी अनेक योजना आखल्या. शिक्षणाचे सार्वत्रिकरण झाले. मुलींची शिक्षणातील गती आणि प्रगती वाढली. यामुळे ग्रामीण भागातही

Hopefully Groove, Sunshine Hope | उम्मीदो वाली ग्रूव्ह, सनशाईन वाली आशा

उम्मीदो वाली ग्रूव्ह, सनशाईन वाली आशा

दिलीप चव्हाण - सेवाग्राम
शासनाने स्त्री शिक्षणाची आवश्यकता ओळखून मुली शिक्षित व्हाव्या, यासाठी अनेक योजना आखल्या. शिक्षणाचे सार्वत्रिकरण झाले. मुलींची शिक्षणातील गती आणि प्रगती वाढली. यामुळे ग्रामीण भागातही मुली गरूडझेपही घेत आहेत; मात्र गावखेड्यातून शिक्षण घेत असलेल्या सावित्रीच्या लेकींची फरफट थाबलेली नाही. पण याही स्थितीत ‘उम्मीदो वाली ग्रूव्ह, सनशाईन वाली आशा’ याप्रमाणे त्यांची शिक्षणाची जिद्द सुरू आहे. एकमेकींचा हात हाती घेत शिकण्यासाठी सेवाग्राम, हमदापूर येथील मुलींची धडपड सुरू आहे.
सेवाग्राम आणि हमदापूर येथे अनेक विद्यार्थी शिकण्यासाठी येतात. हमदापूर येथील शाळेत उंबरा, वायगाव, रज्जकपूर, नंदपूर, परसोडी, पार्डी, शिवणगाव, पहलनपूर, आलगाव, बोंडसूला, देर्डा, आष्टा, नांद्रा, बावापूर, जेजूरी, देऊळगाव, चानकी व कोपरा आदी गावातील विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. तर सेवाग्राम येथील शाळेत वरूड (रे.), औद्योगिक वसाहत, अंबानगर, करंजी (भोगे) व काजी, नागापूर, नांदोरा या गावातील विद्यार्थी येतात. या मार्गांवरून शाळेत येताना साधारण बसशिवाय पर्याय नाही. त्यामुळे ११ वाजता शाळेत येण्यासाठी या मुलींना सकाळी आठ वाजताच डबा घेऊन घरून निघावे लागते. पाच वाजता शाळा सुटल्यावर बसअभावी घरी जातपर्यंत अनेकद त्यांना रात्र होते.
या शाळांमध्ये शिकत असलेल्या बहुतेक सवित्रीच्या लेकी या सामान्य कुटुंबातील आहे. बहुतेकीचे पालक हे रोजमजुरी करणारे. मुलींना मोफत बसची पास आहे, पण याचा फारसा उपयोग नाही. काही गावात परिवहन महामंडळाची बस नसल्याने अनेक अडचणी व समस्यांचा सामना करावा लागतो. या समस्यांमुळे एखादी मुलगी माघारही घेते. शिक्षणाचा मार्गही सोडते. अनेकदा वेळ झाल्यामुळे या सावित्रीच्या लेकीं एकमेकींना धीर देत आठ आठ किलोमिटर पायी घरी जावे लागते. यावेळी त्यांचा बाप डोळ्यात पाणी आणत तिची वाट पाहत असल्याचे वास्तव आहे.
या मुलींमध्ये एवढे बळ कुठून येत असेल याबाबत मुक्त संवाद साधला असता इच्छाशक्ती, शिक्षणाची धडपड आणि एकमेकींचा साथ यावरच ही शिक्षणाची धडपड असल्याचे मत त्या व्यक्त करतात. पालक शेतकरी, मजूर असल्याने शैक्षणिकदृष्ट्या ते लक्ष देवू शकत नाही. तसेच फारशी आर्थिक मदत सुद्धा ते करू शकत नसल्याने जवळपास सर्वच मुली शाळा, अभ्यास सांभाळून सुट्टीच्या दिवशी शेतीच्या कामाला जातात.
परिस्थितीनेच शहाणपण आल्याचे त्यांच्यासोबत बोलताना जाणवते. वृषाली, अंकिता, स्नेहल, प्राजक्ता, दिप्ती, प्रतीक्षा, संगीता, माधुरी, मोनिका, सुष्मिता, प्रिया, आरजू, करीना, रोहिणी या ना अनेक सावित्रीच्या लेकींचा यात समावेश आहे.

Web Title: Hopefully Groove, Sunshine Hope

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.