शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
2
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
3
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
4
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
5
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
6
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
7
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
8
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
9
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
10
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
11
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
12
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
13
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
14
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
15
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
16
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
17
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
18
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
19
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
20
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 

ऐतिहासिक सारंगपुरी तलाव पर्यटनस्थळ टाकतेय कात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 02, 2019 6:00 AM

शहराच्या पर्यटनविकासात भर घालणाऱ्या दुर्लक्षित सारंगपुरी तलावाच्या कायापालट करण्याच्या दृष्टीने नगराध्यक्ष प्रशांत सव्वालाखे यांनी विशेष प्रयत्न केले. पुनरुज्जीवनाकडे लक्ष देत वास्तुविशारदांकडून नकाशा तयार केला. त्यानंतर तीन वर्षांपूर्वी साडेचार कोटींचा प्रस्ताव आमदार दादाराव केचे यांच्यामार्फत शासनाकडे पाठविला. प्रस्तावानंतर निधी मंजूर झाल्यास या तलावाला गतवैभव प्राप्त होईल, अशी अपेक्षा निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देवर्षभरात काम होणार पूर्ण : गुणवत्ता राखून काम करण्याची नागरिकांची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : ऐतिहासिक तथा एकेकाळी आर्वीकरांना जीवनदायी ठरलेला सारंगपुरी जलाशय पर्यटनस्थळ म्हणून विकसित होणार आहे. त्याचे कामही सुरू झाले असून पहिला टप्पा शासनाने मंजूर केला आहे. नगरपालिकेच्या अखत्यारित असलेला हा तलाव अनेक वर्षांपासून दुर्लक्षित हाता. आता या पर्यटनस्थळाचे रुपडे पालटणार असल्याने येथील विकासकामे उत्तररित्या व्हीवी, अशी मागणी आर्वीकरांकडून होत आहे.शहराच्या पर्यटनविकासात भर घालणाऱ्या दुर्लक्षित सारंगपुरी तलावाच्या कायापालट करण्याच्या दृष्टीने नगराध्यक्ष प्रशांत सव्वालाखे यांनी विशेष प्रयत्न केले. पुनरुज्जीवनाकडे लक्ष देत वास्तुविशारदांकडून नकाशा तयार केला. त्यानंतर तीन वर्षांपूर्वी साडेचार कोटींचा प्रस्ताव आमदार दादाराव केचे यांच्यामार्फत शासनाकडे पाठविला. प्रस्तावानंतर निधी मंजूर झाल्यास या तलावाला गतवैभव प्राप्त होईल, अशी अपेक्षा निर्माण झाली आहे. प्रादेशिक पर्यटन विकास योजना २०१६-१७ अंतर्गत या सारंगपुरी तलावाचे सुशोभीकरण करण्यात येणार असल्याची माहिती तत्कालीन मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी दिली होती. जिल्हा नियोजन समितीमार्फत स्थानिक सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना आवश्यक माहिती व रकमेसह अंदाजपत्रक तयार करण्यासंदर्भात पत्र प्राप्त झाल्यानंतर त्यांनी शासनाकडे अंदाजपत्रकही सादर केले होते. त्यानुसार २७ मे २०१९ रोजी २ कोटी ९६ लाख ७२ हजार रुपये शासनाकडून मंजूर करण्यात आले. या कामाकरिता शासनाकडून ६५ लाख रुपयांचा पहिला टप्पा सार्वजनिक बांधकाम विभागाला प्राप्त झाला.त्या निधीतून कामाला सुरुवात करण्यात आली असून सहा एकरात हे काम होत आहे. सध्या प्रशासकीय इमारत, उपाहारगृह व पश्चिमेकडील संरक्षण भिंतीचे कामही सुरू आहे. हे काम कंत्राटदाराला बारा महिन्यांत पूर्ण करायचे आहे. यामध्ये झोपड्या, मुख्य प्रवेशद्वार, खेळण्याचे विविध प्रकार, बांबू मंचानी, बगिचे आणि शिडी, नैसर्गिक वातावरण, बोटिंग व्यवस्था, कार्यालय, बालोद्यान, पाणीपुरवठा, वीजपुरवठा, सौंदर्यीकरण, सुशोभीकरण आदींसह २७ सुविधांचा समावेश आहे.तलावाची होती गिनीज बुकात नोंदब्रिटिश राजवटीत इंग्रजांनी आर्वी विभागाच्या भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास करून निसर्गरम्य अशा ठिकाणी १९१७ ला सारंगपुरी जलाशयाची निर्मिती केली होती. या जलाशयाने १९१७ पासून आर्वीकरांना जलपुरवठा केला. दररोज ११ लाख लिटर पाण्याचा पुरवठा या सारंगपुरी जलाशयातून होता. कोणत्याही यंत्राचा आधार न घेता या जलाशयाचे पाणी नागरिकांच्या तिसऱ्या मजल्यापर्यंत जात होते. त्यामुळे या यशाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये घेण्यात आली होती.सारंगपुरी पर्यटनस्थळांसाठी ६५ लाखांचा पहिला टप्पा प्राप्त झाला असून कंत्राटदाराचे त्यानुसार काम सुरू आहे. काम पाहून शासन टप्प्याटप्प्याने पैसे देणार आहे. १२ महिन्यांत हे काम कंत्राटदाराला पूर्ण करायचे असून या कामावर देखरेख ठेवण्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाची आहे. काम निकृष्ट होणार नाही, याची काळजी घेतली जाईल.शिवाजी जाठे, उपविभागीय अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग आर्वी

टॅग्स :tourismपर्यटन