हिंगणघाट जळित प्रकरण; तडस आणि कुणावार यांनी घेतली पिडितेच्या कुटुंबियांची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2020 14:15 IST2020-02-10T14:14:59+5:302020-02-10T14:15:19+5:30

Hinganghat Burn Case; वर्ध्याचे खासदार रामदास तडस व आमदार समीर कुणावार यांनी सोमवारी दुपारी २ च्या सुमारास पिडित प्राध्यापिकेच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले व आरोपीला शिक्षा होण्यासाठी सर्वतोपरी सहाय्य करण्याचे आश्वासन दिले.

Hinganghat burning case; Tadas and Kunawar visit family of victims | हिंगणघाट जळित प्रकरण; तडस आणि कुणावार यांनी घेतली पिडितेच्या कुटुंबियांची भेट

हिंगणघाट जळित प्रकरण; तडस आणि कुणावार यांनी घेतली पिडितेच्या कुटुंबियांची भेट


लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगणघाट: वर्ध्याचे खासदार रामदास तडस व आमदार समीर कुणावार यांनी सोमवारी दुपारी २ च्या सुमारास पिडित प्राध्यापिकेच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले व आरोपीला शिक्षा होण्यासाठी सर्वतोपरी सहाय्य करण्याचे आश्वासन दिले.
नागपूरहून पिडिताचा मृतदेह तिच्या निवासस्थानी आणण्यात आला असून, तिच्या अंतिम दर्शनासाठी हजारो नागरिकांनी तिच्या घरासमोर मोठी गर्दी केली आहे. दरम्यान पोलिसांनी जमावाला हटवताना केलेल्या सौम्य लाठीहल्ल्याचा निषेध म्हणून नागरिकांनीही पोलिसांवर विटा व दगड भिरकावल्याची घटना घडली होती. खासदार रामदास तडस व आमदार समीर कुणावार यांनी आपल्या सहकाऱ्यांसह पिडितेच्या कुटुंबियांची भेट घेतली व त्यांना धीर दिला.

Web Title: Hinganghat burning case; Tadas and Kunawar visit family of victims