शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

हिंगणघाट जळीत प्रकरणाचा तपास अंतिम टप्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2020 03:20 IST

१५० पानांचे दोषारोपपत्र; विशेष सरकारी वकील निकम यांची नियुक्ती रखडली

महेश सायखेडे

वर्धा : हिंगणघाट येथील जळीत प्रकरणाचा तपास अंतिम टप्प्यात आला आहे. महिला तपास अधिकारी उपविभागीय पोलीस अधिकारी तृप्ती जाधव यांच्याकडून येत्या काही दिवसात आरोपी विक्की उर्फ विकेश नगराळे याच्याविरूद्ध दोषारोपपत्र दाखल करण्यात येणार आहे. हे दोषारोपपत्र सुमारे १५० पानांचे राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

हिंगणघाट येथील नंदोरी चौकात एका प्राध्यापिकेवर पेट्रोल टाकून तिला जीवंत जाळण्याचा प्रयत्न झाला. सुमारे आठ दिवस या प्रकरणातील पीडितेने मृत्यूशी झुंज दिली. त्यानंतर तिची प्राणज्योत मालवली. त्यानंतर या प्रकरणात आरोपीविरुद्ध मनुष्यवधाच्या गुन्ह्याची कलम वाढविण्यात आली आहे. हिंगणघाट जळीत प्रकरणातील आरोपी विक्की उर्फ विकेश नगराळे सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. सुरक्षेच्या दृष्टीने त्याला नागपूर येथील कारागृहात ठेवण्यात आले आहे.अद्याप कोणताही पत्रव्यवहार नाही!हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालविण्यासाठी विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नेमणूक करण्याचे आश्वासन राज्याच्या गृहमंत्र्यांनी दिले होते. मात्र अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांना हा खटला चालविण्यासंदर्भात कुठलाही पत्रव्यवहार शासनाने केला नसल्याची माहिती पुढे आहे. पीडित युवतीचे कुटूंबीय संतप्त झाले असून शासनाच्या भूमिकेवर त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. पीडितेचा मृत्यु झाला त्यावेळी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पीडित युवतीच्या वडीलांना प्रकरण जलदगती न्यायालयात चालविण्यात येईल व विशेष सरकारी वकील म्हणून अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांची नेमणूक शासन करेल असे आश्वासन दिले होते.

टॅग्स :HinganghatहिंगणघाटRapeबलात्कारCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस