मृत कामगाराच्या कुटुंबाला मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2017 23:52 IST2017-10-01T23:52:18+5:302017-10-01T23:52:35+5:30
गिमाटेक्स वणी येथील कामगार भगवान गायकवाड यांचा अपघातात मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांना १ लाख २० हजार ४०० रुपयांची आर्थिक मदत वर्धा जिल्हा सुती मिल मजदूर संघटनेच्यावतीने

मृत कामगाराच्या कुटुंबाला मदत
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगणघाट : गिमाटेक्स वणी येथील कामगार भगवान गायकवाड यांचा अपघातात मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांना १ लाख २० हजार ४०० रुपयांची आर्थिक मदत वर्धा जिल्हा सुती मिल मजदूर संघटनेच्यावतीने आ. समीर कुणावार यांच्या हस्ते मृतकाच्या कुटुंबीयाला रविवारी देण्यात आली.
आमदार कुणावार यांच्या निवासस्थानी आयोजित छोटेखानी कार्यक्रमाला मृतकाची पत्नी सारिका गायकवाड व वडील पुरुषोत्तम गायकवाड यांना प्रत्येकी ६० हजार २०० रुपयांचा धनादेश देण्यात आला. यावेळी संघटनेचे सचिव व कामगार नेते पांडुरंग बालपांडे यांची उपस्थिती होती. गिमाटेक्स कंपनीतील कामगाराचा मृत्यू झाल्यास कामगारांच्या वेतनातून १०० रुपयांची कपात करून ती रक्कम मृतकाच्या कुटुंबियांना देण्यात येते. गिमाटेक्स कंपनीतून काम आटोपून १३ मे २०१७ ला भगवान हा आॅटोने परत जात असता खासगी बसने धडक दिल्याने भगवान गायकवाडचा मृत्यू झाला. याप्रसंगी अंबादास चिंचुलकर व किषोर नगराळे यांचाही मृत्यू झाला होता. सदर दोन्ही मृतकांच्या कुटुंबियांना यापूर्वी आ. समीर कुणावार यांच्या हस्ते आर्थिक मदत देण्यात आली आहे.