जड वाहतुकीने सेलडोह ते सोमलगडचा रस्ता खड्ड्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2019 05:00 IST2019-12-26T05:00:00+5:302019-12-26T05:00:31+5:30

समृद्धी महामार्ग व बुट्टीबोरी-तुळजापूर महामार्ग निर्माण करणाऱ्या अ‍ॅफकॉन आणि दिलीप बिल्डकॉन या दोन्ही कंपन्यांच्यावतीने टिप्परच्या सहाय्याने सोमलगड शिवारातून मुरुमची वाहतूक सुरु आहे. काही ठिकाणी अवैधरित्या गौण खनिजांचे उत्खनन चालविले आहे. या जड वाहनांच्या दिवस-रात्र असंख्य फेºया होत असल्याने सहा ते सात वर्षांपूर्वी केलेला डांबरी रस्ता खड्डयात गेला आहे. सेलडोह ते सोमलगड या डांबरी रस्त्यावर आता माती-गोटेच शिल्लक दिसत आहे.

Heavy traffic from Seldoh to Somalgarh road pits | जड वाहतुकीने सेलडोह ते सोमलगडचा रस्ता खड्ड्यात

जड वाहतुकीने सेलडोह ते सोमलगडचा रस्ता खड्ड्यात

ठळक मुद्देशेतकऱ्यांची अडचण : गावातील अंतर्गत रस्त्याची लागली वाट

लोकमत न्यूज नेटवर्क
केळझर : समृद्धी महामार्ग आणि बुट्टीबोरी ते तुळजापूर महामार्गाकरिता नजिकच्या सोमलगड शिवारातून दिवसरात्र मुरूम वाहतूक होत आहे. या जड वाहतुकीमुळे सेलडोह ते सोमलगड या डांबरी रस्त्याची चांगलीच वाट लागली आहे. महामार्गामुळे अंतर्गत रस्ते खड्डयात गेल्याने गावकऱ्यांसह शेतकऱ्याना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
समृद्धी महामार्ग व बुट्टीबोरी-तुळजापूर महामार्ग निर्माण करणाऱ्या अ‍ॅफकॉन आणि दिलीप बिल्डकॉन या दोन्ही कंपन्यांच्यावतीने टिप्परच्या सहाय्याने सोमलगड शिवारातून मुरुमची वाहतूक सुरु आहे. काही ठिकाणी अवैधरित्या गौण खनिजांचे उत्खनन चालविले आहे. या जड वाहनांच्या दिवस-रात्र असंख्य फेºया होत असल्याने सहा ते सात वर्षांपूर्वी केलेला डांबरी रस्ता खड्डयात गेला आहे. सेलडोह ते सोमलगड या डांबरी रस्त्यावर आता माती-गोटेच शिल्लक दिसत आहे.
सोमलगड शिवारात गावातील बहुतांश शेतकºयांच्या शेतजमिनी असल्याने या शेतकºयांना शेतीच्या वहिवाटीकरिता या मार्गावरून जाताना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सध्या कपाशी पिकाचा हंगाम सुरू आहे.
शेतातून कापसाचे गाठोडे बैलबंडीवर आणताना शेतकºयांना तारेवरची कसरत करावी लागते. नादुरूस्त रस्त्याने प्रवास करताना अनेक शेतकºयांचे अपघात देखील झालेले आहे. शासनाने याकडे लक्ष देत महामार्ग निर्माण करणाºया संबंधीत कपन्यांकडून सेलडोह ते सोमलगड या मार्गाचे तत्काळ डांबरीकरण करून द्यावे, अशी मागणी गावकºयांकडून होत आहे.

महामार्गाचे निर्माण करणाºया कंपन्यांकडून वाहनातून मुरुमाची जड वाहतूक होत आहे. त्यामुळे अवघ्या एका वर्षात डांबरी रस्त्याची वाट लागली आहे. माझे शेत याच मार्गावर असल्याने आता शेतात वहिवाट करण्यासाठीही मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या मार्गाची तत्काळ दुरुस्ती करण्यात यावी.
- केसरीचंद खंगारे, शेतकरी, सेलडोह.

Web Title: Heavy traffic from Seldoh to Somalgarh road pits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.