Heavy rain hampered the way | मुसळधार पावसाने अडविली वाट
मुसळधार पावसाने अडविली वाट

ठळक मुद्देसिरोंचा तालुक्यात अतिवृष्टी : ठेंगण्या पुलांमुळे बसला विद्यार्थ्यांनाही फटका

लोकमत न्यूज नेटवर्क
सिरोंचा : गुरूवारी दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास सिरोंचा तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. जवळपास दीड तास पावसाने झोडपून काढले. त्यामुळे नदी, नाल्यांना पूर आला. सिरोंचा येथे शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थ्यांची घरी जाताना चांगलीच गैरसोय झाली.
सिरोंचा तालुक्यातील बहुतांश गावे लहान आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणासाठी सिरोंचा येथे यावे लागते. ग्रामीण भागातील शेकडो विद्यार्थी सिरोंचा येथे शिक्षण घेतात. तसेच ग्रामीण भागातीलही नागरिक विविध वस्तू खरेदी करण्यासाठी व प्रशासकीय कामांसाठी सिरोंचा येथे येतात. गुरूवारी दुपारच्या सुमारास सिरोंचा तालुक्यात अतिवृष्टी झाली. अतिवृष्टीमुळे कोटापोचमपल्ली, अमरादी, रंगय्यापल्ली, नगरम, आरडा गावांकडे जाणाऱ्या नाल्यांना पूर आला. या नाल्यांवर ठेंगणे पूल असल्याने पुलावरून पाणी वाहण्यास सुरूवात झाली. त्यामुळे घराकडे परतणाºया विद्यार्थ्यांची गैरसोय झाली. पुलावरून पाणी उतरतपर्यंत प्रतीक्षा करावी लागली.


Web Title: Heavy rain hampered the way
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.