भरधाव कारने दोन गार्इंना चिरडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2019 21:25 IST2019-08-11T21:24:57+5:302019-08-11T21:25:15+5:30

भरधाव असलेल्या कारने रस्ता ओलांडत असलेल्या गार्इंना धडक दिली. यात दोन गार्इंचा जागीच मृत्यू झाला. ही घटना वर्धा-नागपूर मार्गावरील नालवाडी शिवारात रविवारी पहाटे ५ वाजताच्या सुमारास घडली. गाई गतप्राण झाल्याने पशुपालकाचे ५० हजारांचे नुकसान झाले आहे.

A heavy car crushed two cows | भरधाव कारने दोन गार्इंना चिरडले

भरधाव कारने दोन गार्इंना चिरडले

ठळक मुद्देनालवाडीतील घटना : ५० हजारांचे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : भरधाव असलेल्या कारने रस्ता ओलांडत असलेल्या गार्इंना धडक दिली. यात दोन गार्इंचा जागीच मृत्यू झाला. ही घटना वर्धा-नागपूर मार्गावरील नालवाडी शिवारात रविवारी पहाटे ५ वाजताच्या सुमारास घडली. गाई गतप्राण झाल्याने पशुपालकाचे ५० हजारांचे नुकसान झाले आहे.
प्राप्त माहितीनुसार, भरधाव असलेल्या जी. जे. २६ ए. ४४६० क्रमांकाच्या कार नालवाडी शिवारात आली असता कारचालकाने आपल्या ताब्यातील वाहन निष्काळजीपणाने चालवून रस्ता ओलांडत असलेल्या गार्इंना धडक दिली. यात दोन गार्इंचा जागीच मृत्यू झाला. अपघात होताच कार रस्त्याच्याकडे असलेल्या मोकळ्या जागेत घुसली. या अपघातात कारचेही मोठे नुकसान झाले आहे.
अपघात झाल्याचे लक्षात येतच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. अपघाताची वार्ता परिसरात वाऱ्यासारखी पसरल्याने घटनास्थळी बर्घ्यांची मोठी गर्दी झाली होती. याच गर्दीचा फायदा घेत कारचालकाने घटनास्थळावरून पळ काढला. माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्याचे दीपक ठाकूर, सचिन सोनटक्के यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. या प्रकरणी अविनाश नामदेव कोपरकर रा. नालवाडी यांच्या तक्रारीवरून शहर पोलीस ठाण्यात आरोपी कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.

Web Title: A heavy car crushed two cows

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात