शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

संकट समयी आरोग्य विभागाची ‘वॉर रुम’ झाली पुन्हा ‘ॲक्टिव्ह’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2022 05:00 IST

प्रभागनिहाय टीम तयार करण्यात आलेली आहे. दररोज कोरोना रुग्णांची यादी आरोग्य विभागाकडे प्राप्त होत असून त्यानुसार प्रत्येक टीमचे सदस्य रुग्णांचा शोध घेत आहेत. यात हायरिस्क, लोरिस्क पेशंट असे दोन प्रकार आहे. ज्यांना डायबिटीस, कॅन्सर, पॅरालिसिस किंवा गरोदर महिलांना टेस्टिंगसाठी सेंटरवर पाठविण्यात येत आहे. तर लोरिस्क रुग्णांना कोविड विषयी माहिती देण्यात येते व तपासणी करण्यास सांगितले जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची सुरुवात झाली असून कोरोनाशी लढण्यासाठी राज्यात गांभीर्याने पावले उचलली जात आहे. ओमायक्राॅनचे संकट दिवसेंदिवस वाढत चालले असताना जिल्हा प्रशासनाकडून पुन्हा प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर दिला जातो आहे. त्या अनुषंगाने जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात असलेली ‘वॉर रुम’ पुन्हा ‘ॲक्टिव्ह’ झाली.  दररोज ५० ते ६० कॉल्स येत असून त्यांच्याशी संपर्क साधला जात असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिलेली आहे..प्रभागनिहाय टीम तयार करण्यात आलेली आहे. दररोज कोरोना रुग्णांची यादी आरोग्य विभागाकडे प्राप्त होत असून त्यानुसार प्रत्येक टीमचे सदस्य रुग्णांचा शोध घेत आहेत. यात हायरिस्क, लोरिस्क पेशंट असे दोन प्रकार आहे. ज्यांना डायबिटीस, कॅन्सर, पॅरालिसिस किंवा गरोदर महिलांना टेस्टिंगसाठी सेंटरवर पाठविण्यात येत आहे. तर लोरिस्क रुग्णांना कोविड विषयी माहिती देण्यात येते व तपासणी करण्यास सांगितले जात आहे.  आरोग्य विभागात असलेल्या वॉररुममध्ये तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रभाकर नाईक यांच्या मार्गदर्शनात चार अधिकारी वॉच ठेवून आहेत. परिसरातील ज्यांना कोरोना झाला त्या परिसरात क्षेत्रीय कार्यालयाचे वैद्यकीय अधिकारी यांना सांगितल्यावर रुग्णवाहिकेने उपचारासाठी पाठविण्यात येत आहे. कमी त्रास असणाऱ्यांना होम क्वारंटाईन केले जाते. दिवसभरात वॉर रुममध्ये ६० वर जास्त जणांशी संपर्क होतो. तसेच यादी रोजच्या रोज अपडेट होते.

माहिती घेताना कर्मचाऱ्यांची दमछाक... -    आरोग्य विभागाच्या वतीने कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांना शोधण्यासाठी वॉर रुम सुरु करण्यात आली आहे. या सर्व वॉर रुमचा आढावा घेतला असता याचे काम उत्कृष्टपणे सुरु आहे. मात्र, नागरिकांचे पत्ते शोधताना कर्मचाऱ्यांची दमछाक होत असल्याचे दिसून येत आहे.

कॉलिंगसाठी चार अधिकारी कार्यरत... -    रुग्णांचा नमुना समजल्यानंतर त्वरित पॉझिटिव्ह रुग्णाला वाॅर रुममधून फोन केल्या जातो व त्यांच्याशी संपर्क साधून त्याच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करुन त्यास प्रथम विलगीकरणात दाखल केले जाते. घशात खवखवतेय...डोकं दुखतेय... तोंडाला चव नाही...आदी विविध समस्या वॉर रुममध्ये नागरिक संपर्क करुन बोलून दाखवत असून त्यांचे समुपदेशनही केले जात आहे.

कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वॉर रुममधून दोन्ही चाचण्या नमुने घेऊन रिपोर्टनुसार रुग्णांशी संपर्क साधून पुढील कार्यवाहीसाठी पाठविले जाते.या कामकाजासाठी ४ अधिकारी कॉलिंगसाठी नियुक्त करण्यात आले आहे. दररोज ५० च्या आसपास नागरिकांशी संपर्क केला जातो आहे.डॉ. प्रभाकर नाईक, तालुका आरोग्य अधिकारी. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याdoctorडॉक्टर