शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
3
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
4
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
5
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
6
गुरुपुष्यामृत २०२६: स्वामी-लक्ष्मी-शनि दोन्ही हातांनी भरघोस देतील, ३ गोष्टी करा; पुण्य-लाभ!
7
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
8
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
9
Mumbai University: Mumbai University: मुंबई विद्यापीठाच्या टी.वाय. बी.कॉम.च्या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्या
10
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
11
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
12
आयटी कंपन्यांमधील कामगार हिताच्या उपाय योजनांकरिता अभ्यास गट गठीत करा, कामगार मंत्र्यांचे आदेश  
13
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
14
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
15
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
16
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
17
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
18
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
19
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
20
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
Daily Top 2Weekly Top 5

२५ हजार नागरिकांचे आरोग्य वार्‍यावर

By admin | Updated: May 23, 2014 00:07 IST

शहीदांच्या भूमीतील प्राथमिक आरोग्य केंद्राची अवस्था दयनीय व बिकट होत आहे. गत वर्षभरापासून वैद्यकीय अधिकार्‍यांची दोन पदे रिक्त आहेत. त्यामुळे एकाच अधिकार्‍याच्या

आष्टी (शहीद) : शहीदांच्या भूमीतील प्राथमिक आरोग्य केंद्राची अवस्था दयनीय व बिकट होत आहे. गत वर्षभरापासून वैद्यकीय अधिकार्‍यांची दोन पदे रिक्त आहेत. त्यामुळे एकाच अधिकार्‍याच्या खांद्यावर आरोग्याची धूरा आहे. उन्हाळ्याच्या दिवसात साथीचे आजार, कार्यालयीन कामकाज व वर्धा येथील सभा ही कामे करणे अवघड झाले आहे. येथे तालुका आरोग्य अधिकारी तथा वैद्यकीय अधिकारी पदाचा कार्यभार डॉ. एस. आर. रंगारी सांभाळत आहेत. दोन वैद्यकीय अधिकारी पद रिक्त आहे. शासन बीएएमएस वैद्यकीय अधिकार्‍यांना नियमीत सेवेत सामावून घेत नाहीत. त्यामुळे मानधन तत्त्वावर काम करण्यास अधिकारी तयार नाहीत. एमबीबीएस झालेले अधिकारी मिळत नाही. त्यामुळे अतिरिक्त प्रभावी अधिकार्‍यांच्या खांद्यावर धूरा देवून दिवसाची कसरत करावी लागत आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या जागेवर ग्रामीण रुग्णालयाचे बांधकाम सुरू आहे. त्यामुळे पर्यायी व्यवस्था म्हणून ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीत प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू आहे. ग्रामीण रुग्णालयाच्या पहिला माळा बांधकाम पूर्ण झाले. दुसर्‍या माळ्याचे काम सुरू आहे. शासनाने तत्काळ ग्रामीण रुग्णालयात कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. (प्रतिनिधी)