जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनापुढे नामफलकाला दोर बांधून घेतला गळफास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 13:29 IST2021-07-16T13:29:31+5:302021-07-16T13:29:57+5:30
Wardha News शुक्रवारी प्रहारच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयात अनोखे आंदोलन करण्यात आले.

जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनापुढे नामफलकाला दोर बांधून घेतला गळफास
ठळक मुद्दे प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांकडे वेधले जिल्हा प्रशासनाचे लक्ष
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : वारंवार निवेदन देऊनही पिपरी (पारगोठान) येथील प्रकल्पग्रस्तांच्या समस्या सोडविण्यासह पुनर्वसीत भागातील विविध प्रश्न निकाली काढण्यात आले नसल्याचा आरोप करीत विविध समस्या तातडीने सोडविण्याच्या मागणीसाठी शुक्रवारी प्रहारच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयात अनोखे आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनादरम्यान सुरज घायवट या आंदोलनकर्त्याने चक्क जिल्हाधिकाऱ्यांच्या नामफलकाला दोराने गळफास लावून 'मला मरायचे नाही... वाचवा' अशी आर्त हाक दिली.