रानडुकरांकडून पिकाची नासाडी
By Admin | Updated: July 9, 2014 23:49 IST2014-07-09T23:49:42+5:302014-07-09T23:49:42+5:30
नजीकच्या धनोडी(बहाद्दरपूर) येथील शेतकरी राजेश हरीप्रसाद जयस्वाल यांच्या चार एकर शेतात पेरलेले सोयाबीन रानडुकरांच्या कळपाने उदध्वस्थ केले. तसेच शेतात मोठमोठे खड्डे करून ठेवले आहे.

रानडुकरांकडून पिकाची नासाडी
रोहणा : नजीकच्या धनोडी(बहाद्दरपूर) येथील शेतकरी राजेश हरीप्रसाद जयस्वाल यांच्या चार एकर शेतात पेरलेले सोयाबीन रानडुकरांच्या कळपाने उदध्वस्थ केले. तसेच शेतात मोठमोठे खड्डे करून ठेवले आहे. यात जयस्वाल यांचे मोठे नुकसान झाले आहे.
२८ जूनला धनोडी येथील शेतकरी राजेश जयस्वाल यांनी या मौज्यातील सर्व्हे नंबर ६४ मधील १.६१ हेक्टर आर या शेतात सोयाबीनची पेरणी केली होती. तसेच त्यांनी पिकांना खतही दिले. शेतात पीक चांगले बहरले असताना ५ जुलैच्या रात्री शेतात जंगली डुकरांचा कळप शिरला. त्यांनी संपूर्ण चारही एकरातील सोयाबीनचे पीक नष्ट केले. जमीन उखरून शेतात अनेक ठिकाणी खड्डे करून ठेवले. दुसऱ्या दिवशी सदर बाब जायस्वा यांच्या लक्षात आली. त्यांनी वनविभागाच्या रोहणा येथील कार्यालयात अर्जाद्वारे ही बाब कळविली. मोक्याचा पंचनामा करून झालेल्या नुकसानाची त्वरीत भरपाई द्यावी अशी विनंती वजा मागणीही त्यांनी केली आहे.
पावसाळ्यात तापत असलेल्या उन्हाळासदृश परिस्थितीने आधीच शेतकरी विवंचनेत सापडला आहे. चांगले उगविलेले सोयाबीन डूकरांनी नष्ट केल्याने आता शेतात काय पेरावे हा मोठा प्रश्न राजेश जयस्वाल यांच्यासमोर उभा आहे.
जंगली श्वापदे नेहमीच शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान करीत असतात. पण वनविभाग झोपेचे सोंग घेवून निद्रिस्त असल्याने अर्ज, विनंतीचा फायदा न होता वन विभाग त्याला केराची टोपली दाखविण्यातच धन्यता मानते. शासनाने या घटनेची गंभीर दखल घेण्याची मागणी केली जात आहे.(तालुका प्रतिनिधी)