शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
2
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
3
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
4
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
6
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
7
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
8
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
9
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
10
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
11
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
12
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
13
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
14
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
15
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
16
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
17
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
18
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
19
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
20
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस

अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण करणाऱ्यास सश्रम कारावास, दंडही ठोठावला

By महेश सायखेडे | Updated: March 29, 2023 18:34 IST

वर्धा येथील जिल्हा न्यायालयाचा निकाल

वर्धा : अल्पवयीन मुलींसोबत अतिप्रसंग करीत त्यांचे लैंगिक शोषण करणाऱ्या आरोपीस दोषी ठरवून त्यास दहा वर्षांच्या सश्रम कारावासासह दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. स्नेहल ऊर्फ छोटू पुरुषोत्तम मून (रा. सिंदी) (मेघे) असे शिक्षेस पात्र ठरलेल्या आरोपीचे नाव असून, हा निकाल वर्धा येथील अतिरिक्त विशेष जिल्हा न्यायाधीश-१ व्ही.टी. सूर्यवंशी यांनी दिला.

आरोपी स्नेहल ऊर्फ छोटू पुरुषोत्तम मून याला बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम कलम ४ सह कलम १८ अन्वये दहा वर्षांचा सश्रम कारावास व पाच हजारांचा दंड तसेच दंड न भरल्यास सहा महिन्यांचा कारावास. भादंविच्या कलम ४४९ अन्वये पाच वर्षांचा सश्रम कारावास व तीन हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास तीन महिन्यांचा कारावास. भादंविच्या कलम ३६३ अंतर्गत दोन वर्षांचा सश्रम कारावास व दोन हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास एक महिन्यांचा कारावास. भादंविच्या कलम ३६६ (अ) अंतर्गत तीन वर्षांचा सश्रम कारावास व तीन हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास दोन महिन्यांचा कारावास. भादंविच्या कलम ३४२ अन्वये सहा महिन्यांचा सश्रम कारावास व ५०० रुपये दंड तसेच दंड न भरल्यास आठ दिवसांचा कारावास. भादंविच्या कलम ५०६ अन्वये एक वर्षाचा सश्रम कारावास व एक हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास एक महिन्याच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. तर पीडितेला नुकसानभरपाई म्हणून दंड रकमेतून दहा हजार रुपये देण्याचे आदेश न्यायाधीशांनी दिले आहेत.

पीडितेचा भाऊ होता प्रत्यक्ष साक्षीदार

पीडिता तसेच तिचा लहान भाऊ आणि पीडितेची मैत्रीण घराच्या आवारात खेळत होते. दरम्यान, आरोपीने तेथे येत पीडिता व तिच्या मैत्रिणीला पीडितेच्या घरात नेत त्यांचे लैंगिक शोषण केले. ही बाब पीडितेच्या लहान भावाने खिडकीतून डोकावून बघितली. आरोपी इतक्यावरच थांबला नाही तर त्याने घटनेची माहिती कुणाला सांगितल्यास पीडितेसह तिच्या मैत्रिणीला जीवे मारण्याची धमकी दिली होती.आरोपी सीसीटीव्हीत झाला होता कैद

पीडितेच्या आईला घटनेची माहिती मिळताच रामनगर पोलिसांत तक्रार नोंदविण्यात आली. पोलिसांनी तपासादरम्यान घटनास्थळाच्या परिसरातील सीसीटीव्हीचे चित्रीकरण तपासात ते ताब्यात घेतले. याच सीसीटीव्ही चित्रीकरणात आरोपी हा पीडिता व तिच्या मैत्रिणीला खोलीत नेत असताना कैद झाला होता. हे चित्रीकरण न्यायालयात पुरावा म्हणून सादर करण्यात आले होते.प्रकरण साक्ष-पुराव्यावर असताना फिर्यादीचा झाला मृत्यू

या प्रकरणी पीडितेच्या आईने रामनगर पोलिस ठाण्यात तक्रार नाेंदविली. अत्याचाराचे हे प्रकरण साक्ष-पुराव्यावर असताना पीडितेच्या आईचे निधन झाले. त्यामुळे या प्रकरणी फिर्यादीची साक्ष नोंदविण्यात आली नाही. परंतु, पीडित, तिची मैत्रीण व प्रत्यक्षदर्शी आदींची साक्ष न्यायालयात तपासण्यात आली.

पीडितेच्या मैत्रिणीवर अत्याचार; ४ एप्रिलला होणार युक्तिवाद

या प्रकरणातील पीडितेच्या मैत्रिणीवरही आरोपीने लैंगिक अत्याचार केल्याचे पुढे आल्याने तिचा वेगळा खटला न्यायालयात युक्तिवादासाठी ४ एप्रिल २०२३ ला ठेवण्यात आला आहे. या प्रकरणी पुढे काय होते याकडेही साऱ्यांचे लक्ष लागले आहे.महिला अधिकाऱ्यांनी केला तपास

संबंधित प्रकरणाचा तपास महिला पोलिस उपनिरीक्षक प्रीती आडे यांनी पूर्ण करून प्रकरण न्यायप्रविष्ट केले. शासकीय बाजू ॲड. विनय आर. घुडे यांनी मांडली. पैरवी अधिकारी म्हणून राजेश थुल यांनी काम पाहिले.१४ साक्षीदारांची तपासली साक्ष

या प्रकरणी एकूण १४ साक्षीदारांची साक्ष न्यायालयात तपासण्यात आली. प्रथम नऊ साक्षीदारांची साक्ष जिल्हा शासकीय अभियोक्ता गिरीश व्ही. तकवाले यांनी तपासले, तर नंतरच्या पाच साक्षीदारांची साक्ष विशेष सरकारी अभियोक्ता विनय आर. घुडे यांनी तपासून युक्तिवाद केला. दोन्ही बाजू व पुरावे लक्षात घेऊन न्यायाधीश व्ही. टी. सूर्यवंशी यांनी आरोपीला बुधवारी (दि. १९) शिक्षा ठोठावली.

टॅग्स :Courtन्यायालयMolestationविनयभंगSexual abuseलैंगिक शोषणwardha-acवर्धा