शहरं
Join us  
Trending Stories
1
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
2
Exit Poll 2026: टुडेज चानक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
3
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
4
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
5
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
6
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
7
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
8
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
9
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
10
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
11
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
12
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
13
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
14
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
15
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ५ मे पासून 'या' भागांत ३० तास पाणीपुरवठा बंद; पाहा संपूर्ण यादी
17
Travel : मे महिन्याच्या उन्हातही अनुभवा डिसेंबरची थंडी! भारतातील 'या' थंडगार ठिकाणांना नक्की भेट द्या
18
पाकिस्तानचा 'डबल गेम', अमेरिकेच्या निर्बंधांना झुगारून इराणसाठी सुरू केले ६ व्यापारी भू-मार्ग
19
बंगालमध्ये त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यास काँग्रेस ममता दीदींना पाठिंबा देणार? मल्लिकार्जुन खर्गे स्पष्टच बोलले
20
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
Daily Top 2Weekly Top 5

जमिनीच्या व्यवहारातील गैरप्रकाराला लागणार लगाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2020 05:00 IST

सद्यस्थितीत अस्तित्वात असलेल्या तंत्रज्ञानानुसार अचूक जीपीएस रीडिंग घेण्यासाठी किमान १ पासून चार तासांपर्यंत अवधी लागतो. जीपीएस रीडिंग घेण्यासाठीचा हा वेळ कमी करण्यासाठी भूमी अभिलेख विभागाच्यावतीने सर्व्हे आॅफ इंडियाच्या मदतीने कॉर्स या आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात येणार आहे. कॉर्स आधारे जीपीएस रीडिंग केवळ ३० सेकंदात घेता येणार आहे.

ठळक मुद्देमोजणीसाठी ‘कॉर्स’ आधुनिक तंत्रज्ञान । जिल्ह्यातील दोन तालुक्यांत स्टेशनची उभारणी

सुहास घनोकार।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जमीन मोजणीसाठी जीपीएस रीडिंग घेण्यासाठीचा वेळ कमी करण्यासाठी भूमी अभिलेख विभागाने ‘कॉर्स’ (कंटीन्युअस ऑपरेशन रेफरन्स स्टेशन) स्टेशन उभारण्याचा निर्णय घेतला. याअंतर्गत जिल्ह्यातील दोन तालुक्यात कॉर्स स्टेशन उभारण्यात आले आहेत. ‘कॉर्स’च्या आधारे जीपीएस रीडिंग केवळ ३० सेंकदात घेता येणार आहे. या सुविधेमुळे जमीन मोजणीसाठी लागणारा वेळ कमी होणार आहे. या तंत्रज्ञानामुळे जमीन मोजणीत पारदर्शकता आणि गतिमानता येणार आहे. या तंत्रज्ञानाचा उपयोग गावठाण मोजणीबरोबरच जमीन मोजणीसाठी होणार आहे. अक्षांश, रेखांश सापेक्ष मोजणी झाली असल्याने आपली जमीन कधीही शोधता येणार आहे. एका जमिनीची अनेक जणांना विक्री करण्याच्या गैरप्रकाराला या तंत्रज्ञानामुळे आळा बसणार आहे.जमीन मोजणीसाठी ईटीएस मशीनच्या सहाय्याने मोजणी करणे हा एक पर्याय उपलब्ध आहे. संबंधित जागेवर जीपीएस रीडिंग घेऊन त्या क्षेत्राचे अक्षांश व रेखांश घेतले जातात. या अक्षांश व रेखांशच्या आधारे जमीन मोजणी करणे सोयीचे ठरते. मात्र, सद्यस्थितीत अस्तित्वात असलेल्या तंत्रज्ञानानुसार अचूक जीपीएस रीडिंग घेण्यासाठी किमान १ पासून चार तासांपर्यंत अवधी लागतो. जीपीएस रीडिंग घेण्यासाठीचा हा वेळ कमी करण्यासाठी भूमी अभिलेख विभागाच्यावतीने सर्व्हे ऑफ इंडियाच्या मदतीने कॉर्स या आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात येणार आहे. कॉर्स आधारे जीपीएस रीडिंग केवळ ३० सेकंदात घेता येणार आहे.जिल्ह्यातील देवळी आणि आष्टी (शहीद) तालुक्यात स्टेशन उभारण्यात आले आले आहे. याकरिता सर्व्हे ऑफ इंडियाची मदत घेतली जात आहे. आगामी काळात संपूर्ण जिल्ह्यात कॉर्स स्टेशनचे जाळे उभारले जाणार आहे. राज्य शासनासोबतच सर्व्हे ऑफ इंडियाला या तंत्रज्ञानाचा नकाशा तयार करण्यासाठी उपयोग होणार आहे, कॉर्सच्या सहाय्याने गावठाणाचीदेखील मोजणी केली जाणार आहे.५ एकर जमिनीची १५ मिनिटांत मोजणीकॉर्स हे जीपीएस रीडिंग घेण्यासाठी भविष्यातील आधुनिक तंत्रज्ञान आहे. याद्वारे जीपीएस रीडिंग घेण्यासाठी केवळ ३० सेकंद लागतात. याकरिता केवळ इंटरनेटची गरज आहे. इंटरनेट उपलब्ध असेल तर अचूक रीडिंग केवळ पंधरा मिनिटांत मिळणार आहे. सद्यस्थितीत पाच एकर जमिनीचे क्षेत्र मोजण्यासाठी एक दिवस लागतो. कॉर्स जीपीएस रीडिंग लवकरण मिळत असल्याने पाच एकर जमिनीचे क्षेत्र मोजण्यासाठी केवळ १५ मिनिटे लागणार आहते. त्यामुळे एका दिवसात आठ ते दहा मोजणीचे काम होऊ शकेल. मोजणीमध्ये ही एक क्रांतिकारी योजना ठरणार आहे.जिल्ह्यात भूखंडांचे श्रीखंड खाणारी टोळीजिल्ह्यात भूखंडांचे श्रीखंड खाणारी टोळी मोठ्या प्रमाणावर सक्रिय आहे. अनेक जण सर्वसामान्यांची फसवणूक करूनच गब्बर झाले आहेत. भूमी अभिलेख विभागाने जमीन मोजणीसाठी कॉर्स आधुनिक तंत्रज्ञान आणल्याने जमीन व्यवहारात आता पारदर्शकता येणार आहे. यामुळे सर्वसामान्यांची जमीन खरेदी-विक्री व्यवहारात होणारी फसवणूकदेखील टळणार आहे.

टॅग्स :technologyतंत्रज्ञान