शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: कित्येक निष्पापांचा जीव घेतला! आता स्वतःच्या कुटुंबाचा खात्मा झाल्यावर दहशतवादी मसूद अजहर म्हणतो...
2
“दहशतवादी हल्ल्याला युद्ध हे उत्तर नाही, एअर स्ट्राइक करणे पर्याय असू शकत नाही”: राज ठाकरे
3
‘ऑपरेशन सिंदूर’ म्हणजे माझ्या आईसारख्या महिलांचा सन्मान; गणबोटे कुटुंबाने मानले मोदींचे आभार 
4
युद्धापूर्वीच पाकिस्तानचे आत्मसमर्पण, संरक्षण मंत्री म्हणाले- 'आम्ही कारवाई करणार नाही'
5
Operation Sindoor : अखेर न्याय झालाच! भारताने पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला; कोणी दिलं 'ऑपरेशन सिंदूर' हे नाव?
6
Operation Sindoor : 'ऑपरेशन सिंदूर'नंतर काय काय घडलं? जगभरातून समर्थन...
7
'अभी पिक्चर बाकी है...', ऑपरेशन सिंदूरनंतर माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांची सूचक पोस्ट!
8
पीएम किसानचा २०वा हप्ता कधी येणार? तुमचं नाव यादीत आहे का? मोबाईलवरुनही तपासू शकता
9
Operation Sindoor : 'ऑपरेशन सिंदूर'च नव्हे, भारताने आधीही पाकिस्तानविरुद्ध केलेल्या 'या' मोठ्या कारवाया!
10
'ऑपरेशन सिंदूर' हेच नाव का ठेवले गेले? काय आहे भारतीय संस्कृतीत सिंदूरचे महत्त्व? वाचा!
11
Operation Sindoor Live Updates: "यापुढेही भारतावर हल्ल्याची शक्यता, म्हणून उत्तर देणे गरजेचे होते"
12
Operation Sindoor: कुख्यात दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबाचा खात्मा; १४ लोकांना यमसदनी धाडलं
13
आजोबा, वडील एक्स आर्मी, पतीही...! कोण आहेत 'ऑपरेशन सिंदूर'ची माहिती देणाऱ्या लेफ्टनंट कर्नल सोफिया कुरेशी
14
Operation Sindoor: नऊ ठिकाणं... ९० दहशतवाद्यांचा खात्मा; भारतीय लष्कराने दहशतवाद्यांचे कंबरडेच मोडले!
15
Operation Sindoor: २५ मिनिटांत ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त; कर्नल सोफिया कुरैशी यांनी सांगितला थरार
16
Operation Sindoor : पाकिस्तानमध्ये हल्ल्याच्या २३ मिनिटे आधीच लष्कराने ट्विट केले? समोर आली माहिती
17
‘ऑपरेशन सिंदूर’चे श्रेय तुम्ही घेऊ नका, ते फक्त भारतीय सेनेचेच; संजय राऊतांची सरकारवर टीका
18
'ऑपरेशन सिंदूर'चा परिणाम! 'या' डिफेन्स स्टॉक्सने घेतली मोठी झेप; ३ महिन्यात नफा दुप्पट
19
गृह मंत्रालय अलर्ट! निमलष्करी दलांच्या सुट्ट्या रद्द; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर भारत-पाकमधील तणाव वाढला
20
पाकिस्तानी स्टॉक मार्केटचे काय हाल ऐकाल...; रात्री भारताची मिसाईल कोसळली, दिवसा भीतीने शेअर बाजार...

वर्धा जिल्ह्यातल्या पांढुर्णा आश्रम शाळेतील बलात्कार प्रकरणी आरोपीला फाशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2018 11:53 IST

आष्टी तालुक्यातील पांढुर्णा येथील आदिवासी आश्रम शाळेतील अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण प्रकरणात आरोपी राजू उर्फ राजकुमार लांडगे (४७) रा. साहूर, ता. आष्टी याला फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

ठळक मुद्देवर्धा न्यायालयाचा निकाल नव्या कलमानुसार निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : आष्टी तालुक्यातील पांढुर्णा येथील आदिवासी आश्रम शाळेतील अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण प्रकरणात आरोपी राजू उर्फ राजकुमार लांडगे (४७) रा. साहूर, ता. आष्टी याला फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. हा निकाल येथील विशेष न्यायाधीश अंजू शेंडे यांनी गुरुवारी दिला. मुलींच्या वसतिगृहाची अधीक्षक वैशाली दिघोरे हिला कलम २१(२) बाल लैंगिक अत्याचार कायद्यांतर्गत ६ महिने सश्रम कारावास व १००० रुपये दंड तसेच दंड न भरल्यास १५ दिवस साध्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली.घटनेची थोडक्यात हकीकत अशी की, राजू उर्फ राजकुमार लांडगे हा पांढुर्णा येथील आश्रम शाळेतील नवीन इमारतीवर चौकीदार म्हणून काम करीत होता. शाळेतील अल्पवयीन आदिवासी मुली त्याला राजूदादा म्हणूनच ओळखत होत्या. याच गोष्टीचा गैरफायदा घेवून राजूने या मुलींचे लैंगिक शोषण सुरू केले. दोन मुलींवर बलात्कार केला. प्रकरणाची माहिती एका मुलीने आई-वडिलांना दिल्यानंतर पोलिसात तक्रार करण्यात आली. चौकशीअंती राजूने यापूर्वी देखील दुसऱ्या पीडित मुलीवर बलात्कार केल्याचे उघड झाले. त्या अनुषंगाने पोलिसांनी चौकशी सुरू केली असता दुसऱ्याही प्रकरणात त्याचेविरूद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले.पहिल्या प्रकरणातच त्याला मरेपर्यंत जन्मठेप सुनावण्यात आली. दरम्यान, दुसऱ्या प्रकरणातही त्याला शिक्षा सुनावण्यात आली. याचवेळी भादंविचे कलम ३७६ (ई) हे नव्याने दुरूस्ती करून कायद्यामध्ये घेतले.अशा प्रकारच्या केसेसमध्ये आजपर्यंत कोणतेही उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालयाचे कोणतेही न्यायनिवाडे उपलब्ध नसल्यामुळे विद्यमान कोर्टाने वर्धा येथील ज्येष्ठ वकील पी.बी. टावरी यांची अ‍ॅमिकस क्युरी (कोर्टाचे मित्र) म्हणून नियुक्ती केली. त्यामुळे सदर प्रकरणात त्यांनी कोर्टाला हा न्यायनिवाडा देण्यात मदत केली . आरोपीविरूद्ध दोष सिद्ध होताच नवीन कायद्यानुसार मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली. आरोपीविरूद्ध पुरावे गोळा करून उपविभागीय पोलीस अधिकारी राजन पाली यांनी दोषारोपपत्र दाखल केले.

२० वर्षानंतर फाशीचा निर्णयवर्धा न्यायालयात यापूर्वी १९९७-९८ साली सुरेश मसराम या आरोपीस कलम ३७६ भादंवि व ३०२ भादंवि अंतर्गत फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. सदर प्रकरणात त्यावेळेस आजचे जिल्हा शासकीय अभियोक्ता गिरीष तकवाले हे आरोपीचे वकील होते व आज झालेल्या न्यायनिवाड्यात गिरीश तकवाले यांनी सरकारची बाजू यशस्वीपणे मांडून आरोपीस फाशीची शिक्षा दिली.

सुधारित कायद्यानंतर राज्यात दुसरी फाशीमुंबई येथील शक्ती मिल प्रकरणात तत्कालीन न्यायाधीशांनी चार आरोपींना सुधारीत कायद्यांतर्गत फाशीची शिक्षा ठोठावली होती. त्यानंतर वर्धा जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील पांढुर्णा प्रकरणात आरोपीला पोक्सो व बलात्काराच्या गुन्ह्यात फाशीची शिक्षा ठोठावली असल्याचे न्यायालयीन सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :Crimeगुन्हा