तेरवीवर खर्च न करता स्मशानभूमीत हातपंप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2020 05:00 IST2020-05-03T05:00:00+5:302020-05-03T05:00:07+5:30

कोरोना संकटामुळे तेरवीसारखा कार्यक्रम करणे शक्य नव्हते. त्यामुळे तेरवीवर होणारा खर्च टाळल्या गेला. हाच खर्च त्यांनी स्मशानभूमीत कूपनलिकेवर केला. कूपनलिकेचे लोकार्पण सरपंच रमा मंडाळी, उपसरपंच उज्ज्वला बुरबुरे, सदस्य प्रफुल पुसदेकर यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

Hand pump in the cemetery without spending on teravi | तेरवीवर खर्च न करता स्मशानभूमीत हातपंप

तेरवीवर खर्च न करता स्मशानभूमीत हातपंप

ठळक मुद्देधनराज गोल्हर यांनी समाजापुढे ठेवला आदर्श

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगणघाट : व्यक्तीच्या मृत्यूनंतर तेरवीवर अनाठायी खर्च न करता त्यातून समाजोपयोगी कार्य करता येऊ शकते, याचा परिचय उद्योजक धनराज गोल्हर यांनी प्रत्यक्ष कृतीतून दिला.
गोल्हर यांचे सासरे वासुदेव पांडुरंग बकाने यांचे १५ एप्रिल रोजी निधन झाले. त्यांचा अंत्यविधी कडाजना येथील स्मशानभूमीत पार पडला. दरम्यान स्मशानभूमीत पाण्याची अपुरी व्यवस्था असल्याचे गोल्हर यांच्या निदर्शनास आले. त्यांनी लगेच सासरे वासुदेव बकाने यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ स्मशानभूमीत पाण्याची सोय करण्याचा निर्णय घेतला आणि तो अंमलातही आणला.
कोरोना संकटामुळे तेरवीसारखा कार्यक्रम करणे शक्य नव्हते. त्यामुळे तेरवीवर होणारा खर्च टाळल्या गेला. हाच खर्च त्यांनी स्मशानभूमीत कूपनलिकेवर केला. कूपनलिकेचे लोकार्पण सरपंच रमा मंडाळी, उपसरपंच उज्ज्वला बुरबुरे, सदस्य प्रफुल पुसदेकर यांच्या उपस्थितीत करण्यात आले. नवनाथ पाटील, प्रणव गोल्हर, प्रवीण बरेहा, रमजान शेख, जय गोल्हर, भानुदास तेलहांडे, विशाल इटनकर, हेमंत सहारे, प्रकाश दीक्षित आदींनी सहकार्य केले.

Web Title: Hand pump in the cemetery without spending on teravi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.