गुरूपौर्णिमेची कार्यशाळा रद्द
By Admin | Updated: August 1, 2015 02:35 IST2015-08-01T02:35:05+5:302015-08-01T02:35:05+5:30
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अभियान अंतर्गत गुणवत्ता विकास कार्यक्रमाकरिता जि.प. शिक्षण विभाग प्राथमिकच्या वतीने प्रत्येक तालुका स्तरावर कार्यशाळेचे आयोजन केले आहे.

गुरूपौर्णिमेची कार्यशाळा रद्द
वर्धा : प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अभियान अंतर्गत गुणवत्ता विकास कार्यक्रमाकरिता जि.प. शिक्षण विभाग प्राथमिकच्या वतीने प्रत्येक तालुका स्तरावर कार्यशाळेचे आयोजन केले आहे. यात कारंजा व आष्टी पं. स ची कार्यशाळा गुरुपौर्णिमेच्या दिवशी ठेवण्यात आल्याने ती रद्द करण्यात आली.
जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील शाळा-मुख्याध्यापकांच्या कार्यशाळेचे तालुकास्तरावर करण्यात आले होते. यात वर्धा व सेलू पं. स. मध्ये २८ जुलै, समुद्रपूर व हिंगणघाट पं. स. मध्ये ३० जुलै, आष्टी व कारंजा पं. स. मध्ये ३१ जुलै आणि आर्वी व देवळी पं.स. मध्ये ५ आॅगस्ट अशाप्रकारचे नियोजन करण्यात आले आहे. परंतु या कार्यशाळेच्या नियोजनामध्ये आष्टी व कारंजा पं.स. मधील कार्यशाळा गुरूपोर्णिमेच्या दिवशी ठेवलेली होती. या दिवशी जि.प., न.प. व सर्व खाजगी शाळांना सुटी आहे. शिक्षणाधिकारी व शिक्षक संघटनेच्या सुट्या निर्धारणाच्या सभेमध्ये ३१ जुलै ला गुरूपोर्णिमेची स्थानिक सुटी ठरविण्यात आली होती. त्यामुळे कारंजा व आष्टी येथील कार्यशाळेची तारीख बदलविण्यासंबंधी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांना निवेदन देण्यात आले होते. या निवेदनाची दखल घेत ही मागणी मान्य करण्यात येऊन कार्यशाळा पुढे ढकलली आहे.(शहर प्रतिनिधी)