बोर व्याघ्र प्रकल्पात पाहुणा रानगवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2020 05:01 IST2020-06-09T05:00:00+5:302020-06-09T05:01:24+5:30
वनपरिक्षेत्र अधिकारी नीलेश गावंडे, क्षेत्रसहाय्यक मोरे, वनरक्षक भाकरे, चौधरी व चालक श्रीराम हे बोर व्याघ्र प्रकल्पातील मुलाई होड परिसरात गस्त घालत असताना एक नवीन वन्यप्राणी झुडपात चारा खाताना श्रीराम यांना दिसला. त्यानंतर श्रीराम यांनी याची माहिती इतरांना दिली.

बोर व्याघ्र प्रकल्पात पाहुणा रानगवा
रितेश वालदे।
लोकमत न्यूज नेटवर्क
बोरधरण : देशातील सर्वात छोटा व्याघ्र प्रकल्प म्हणून ओळख असलेल्या बोर व्याघ्र प्रकल्पात गस्तीदरम्यान मुलाई डोह या भागात पाहूण्या रानगवाचे दर्शन वनविभागाच्या अधिकाऱ्यांना झाले आहे. तो कॅमेºयात कैद झाला असून तब्बल सात वर्षानंतर बोर व्याघ्र प्रकल्पात रानगवा दिसल्याचे सांगण्यात येत आहे.
वनपरिक्षेत्र अधिकारी नीलेश गावंडे, क्षेत्रसहाय्यक मोरे, वनरक्षक भाकरे, चौधरी व चालक श्रीराम हे बोर व्याघ्र प्रकल्पातील मुलाई होड परिसरात गस्त घालत असताना एक नवीन वन्यप्राणी झुडपात चारा खाताना श्रीराम यांना दिसला. त्यानंतर श्रीराम यांनी याची माहिती इतरांना दिली. वनपरिक्षेत्र अधिकारी नीलेश गावंडे यांनी वेळीच वाहन थांबविण्याचे सांगून झुडपाच्या दिशेने बारकाईने पाहणी केली असता तो रानगवा असल्याचे निदर्शनास आले. शिवाय त्याला वनविभागाच्या अधिकाऱ्यानी कॅमेऱ्यात कैद केले. बोर व्याघ्र प्रकल्पात मागील पाच वर्षांमध्ये रानगवाचे कुणालाही दर्शन झाले नव्हते. अशातच लॉकडाऊनच्या काळात रानगवाचे दर्शन झाल्याने वनविभागाच्या कर्मचाºयांमध्ये आनंद संचारला आहे.
२०१३ मध्ये घेतली होती नोंद
२०१३ मध्ये एका रानगवाची नोंद बोर व्याघ्र प्रकल्पात घेण्यात आली होती. तर ७ वर्षानंतर हा योग पुन्हा आला आहे. या पाहुण्या रानगवाची नोंद बोर व्याघ्र प्रकल्पातील अधिकारी यांनी घेतली आहे.