शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणीकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...
3
Daya Dongre Death: पडद्यावरील खाष्ट सासू हरपली! ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन
4
भीषण! भरधाव डंपरची बाईकला धडक, लोकांना चिरडलं; १९ जणांचा मृत्यू, धडकी भरवणारा Video
5
Video: "मी कॅमेऱ्यावर कसं सांगू, ते वैयक्तिक..."; ब्ल्यू प्रिंटवर भाजपा उमेदवाराचं उत्तर व्हायरल
6
'त्यांनी अपमानाचे मंत्रालय निर्माण करावे...' प्रियांका गांधी यांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
7
स्वतःच्याच वडिलांचे नाव घ्यायला लाज वाटते का?, 'जंगलराज'चा उल्लेख करत PM मोदींचा घणाघात
8
"आशिष शेलारांची बुद्धी चांगली होती, आता गंज लागलाय कारण..."; संदीप देशपांडेंचे दुबार मतदारांवरून उलट सवाल
9
फक्त लग्न करण्यास नकार देणे म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नाही: सर्वोच्च न्यायालय
10
शेरवानी घातली, फेटा बांधला, नवरदेव तयार झाला; तितक्यात एक फोन आला अन् सगळ्यांनाच धक्का बसला!
11
Smriti Mandhana: 'वनडे क्वीन'ची 'परफेक्ट कपल गोल' सेट करणारी लव्हस्टोरी! पलाशसोबतचा मैदानातील 'तो' व्हिडिओ व्हायरल
12
रझा अकादमीविरोधात लाखोंचा मोर्चा राज ठाकरेंनी काढला, तेव्हा भाजपावाले कुठे होते?; मनसेचा पलटवार
13
नवरीच्या वडिलांनी लढवली शक्कल; लग्नात कपड्यांवरच लावला QR कोड, पाहुण्यांनी स्कॅन केलं अन्...
14
भारतातील आघाडीचा टूथपेस्ट ब्रँड 'कोलगेट' आता लोक खरेदी करत नाहीयेत? विक्रीत सातत्यानं घट, जाणून घ्या कारण
15
PPF, EPF की GPF? तुमच्या निवृत्तीसाठी कोणती योजना चांगली? तिन्हींमध्ये नेमका काय फरक?
16
Jaipur Accident: डंपर बनला काळ! कारला धडक देत ५ वाहनांना उडवले, ५० जणांना चिरडले, १० जणांचा मृत्यू   
17
बापरे! तब्बल ८८ कोटीला एक टॉयलेट सीट विकतोय 'हा' माणूस; अखेर इतकी महाग का आहे?
18
‘हर-मन-की बात’... कुशीत ट्रॉफी, आणि टी-शर्टवरील खोडलेला ‘A Gentleman’s’ शब्दासह दिलेला मेसेज चर्चेत
19
टेक फंडांचा एका वर्षात निगेटिव्ह परतावा! 'या' ५ योजनांमध्ये सर्वाधिक नुकसान, गुंतवणूकदारांनी काय करावे?
20
"तेव्हा वाचलो पण आता प्रत्येक दिवस..."; अहमदाबाद विमान दुर्घटनेतून बचावलेल्या एकमेव व्यक्तीला 'या' गोष्टीचं दुःख!

तूर व चण्यावर हिरव्याअळीचा प्रादुर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2018 23:36 IST

जिल्ह्यात सध्या ढगाळी वातावरण असून तूर आणि चना पिकावर हिरव्याअळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. सदर ढगाळी वातावरण आणखी काही दिवस कायम राहिल्यास सध्या थोड्या प्रमाणात दिसणाऱ्या हिरव्याअळीचा प्रादुर्भाव रौद्ररुप धारण करू शकते, असा असा अंदाज तज्ज्ञांकडून वर्तविला जात आहे.

ठळक मुद्देढगाळ वातावरणाचे दुष्परिणाम : दुर्लक्ष केल्यास उत्पादनात घट येण्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यात सध्या ढगाळी वातावरण असून तूर आणि चना पिकावर हिरव्याअळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. सदर ढगाळी वातावरण आणखी काही दिवस कायम राहिल्यास सध्या थोड्या प्रमाणात दिसणाऱ्या हिरव्याअळीचा प्रादुर्भाव रौद्ररुप धारण करू शकते, असा असा अंदाज तज्ज्ञांकडून वर्तविला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कृषी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनातच उपाययोजना करणे गरजेचे आहे.जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी यंदाच्या वर्षी एकूण सहा लाख एक हजार ५३७ हेक्टरवर तुरीची लागवड केली. सध्या तूर पीक फूलावर असून शेंगा भरण्याच्या स्थितीत आहे. या पिकावर सध्या शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. इतकेच नव्हे तर आता हिरव्याअळीनेही या पिकावर आक्रमण केल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. ढगाळी वातावरण आणखी काही दिवस कायम राहिल्यास ही परिस्थिती अधिक विदारक रुप धारण करण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे तूर उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. तर चना पीक सध्या फुलोऱ्यावर आहे. सुरूवातीला ज्यांनी चन्याची लागवड केली त्यांच्या शेतातील उभे चना पीक सध्या घाट्या धरत असल्याचे दिसून येते. परंतु, याच पिकावर सध्या ढगाळी वातावरणामुळे हिरव्याअळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. सदर अळी ही सध्या चना पिकावर अगदी मुंगीच्या आकाराची असल्याचे कृषी तज्ज्ञांच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे चना उत्पादनाकांनी तात्काळ कृषी तज्ज्ञांच्या सल्ल्याने उपाययोजना करणे गरजेचे आहे.काही शेतकऱ्यांना बगळ्यावर विश्वासचन्यावर सध्या हिरव्याअळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. कृषी विभागाच्या अधिकाºयांच्या पाहणीत हे स्पष्ट झाले आहे. हिरव्याअळीवर नियंत्रण मिळविण्यासाठी काही शेतकऱ्यांनी आवश्यक औषधांची फवारणी केली आहे. परंतु, काही शेतकरी सदर अळी बगळे खात असल्याने फवारणीची गरज नसल्याचे बोलतात. असे असले तरी हिरव्या अळीला वेळीच नियंत्रणात आणले नाही तर उत्पादनात घट येण्याची शक्यता असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.तापमान घसरल्याने तुरीवर विपरीत परिणामजिल्ह्यात सध्या ढगाळी वातावरण आहे. त्यामुळे अळ्यांचा प्रादुर्भाव तूर पिकावर दिसून येत आहे. शिवाय दिवसेंदिवस तापमानात घट होत असून १० डिग्री पेक्षा कमीचे तापमान तूर पिकावर विपरीत परिणाम करणारे ठरते. काही शेतातील तूर पीक वाळत असल्याचे तसेच शेंगा पूर्णपणे भरत नसल्याचे कृषी विभागाच्या पाहणीत पुढे आले आहे. तुरीला रात्रीचे तापमान १० डिग्रीपेक्षा कमी झालेले मानवत नाही. शिवाय इजा पोहोचून मर सुरू होते. हे टाळण्यासाठी तूर उत्पादक शेतकऱ्यांनी सायंकाळी उशीरा शेतात कोपऱ्यामध्ये शेकोटी पेटवावी. हा साधा प्रयोग फायद्याचा ठरणारा असल्याचे सांगण्यात येते.१३,१३९ हेक्टरवर गहू तर ३४,५७९ हेक्टरवर चण्याची लागवडयंदाच्या वर्षी निसर्गाच्या लहरीपणाचा शेतकºयांना चांगलाच फटका सहन करावा लागल्याचे वास्तव आहे. त्यातच समाधानकारक पाऊस न झाल्याने मागील दोन वर्षांच्या तुलनेत यंदा गव्हाच्या पेऱ्यात घट झाली आहे. यंदा १३ हजार १३९ हेक्टरवर गव्हाची तर ३४ हजार ५७९ हेक्टरवर चन्याची लागवड करण्यात आली आहे.कृषी विभागात क्लोरोफायरीफॉस ५० टक्के अनुदानावर उपलब्धतूर व चन्यावरील हिरव्याअळीचा बंदोबस्त करण्यासाठी शेतकऱ्यांनी क्लोरोफायरीफॉस आणि क्विनॉलफॉसची फवारणी कृषी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनात पिकावर करावी. सध्या क्लोरोफायरीफॉस कृषी विभागाकडे ५० टक्के अनुदानावर उपलब्ध आहे. त्याचा लाभ शेतकºयांनी घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती