शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

पाणी टंचाईवर मात करण्यासाठी २१४ गावांचा बृहत आराखडा

By admin | Updated: February 9, 2015 23:18 IST

‘सर्वांसाठी पाणी व टंचाईमधून गावांची मुक्ती’ या जलयुक्त शिवार कार्यक्रमातून पाणीटंचाई कायम हद्दपार करण्याचे उद्दीष्ट आहे़ यात जिल्ह्यातील २१४ गावांचा समावेश करण्यात आला

वर्धा : ‘सर्वांसाठी पाणी व टंचाईमधून गावांची मुक्ती’ या जलयुक्त शिवार कार्यक्रमातून पाणीटंचाई कायम हद्दपार करण्याचे उद्दीष्ट आहे़ यात जिल्ह्यातील २१४ गावांचा समावेश करण्यात आला असून बृहत आराखडा तयार केला जात आहे़जलयुक्त शिवार कार्यक्रमाच्या पहिल्या टप्प्यात २१४ गावांचा समावेश आहे़ यात गावातील नद्या, नाले, विहिरींचा अभ्यास करून पावसाचे पाणी अडविण्यासाठी करावयाच्या उपाययोजना पूर्वी अस्तित्वात असलेल्या जलसंवर्धन बंधाऱ्यांची दुरूस्ती, खोलीकरण करण्यास प्राधान्य राहणार आहे़ प्रत्येक गाव पाण्यासाठी स्वयंपूर्ण व्हावे, ही कल्पना आहे़ पावसाचे पाणी अडविण्यासह गावात उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करणे, पिण्यासाठी जनावरांसाठी तसेच शेतीसाठी लागणाऱ्या पाण्यांचे या योजनेंतर्गत वाटर बजेट तयार केले जाणार आहे. यासाठी प्रथम बृहत आराखडा तयार करण्यात येत आहे. या यात लोकसहभागही महत्त्वाचा राहणार आहे़(कार्यालय प्रतिनिधी)