पाणी टंचाईवर मात करण्यासाठी २१४ गावांचा बृहत आराखडा
By Admin | Updated: February 9, 2015 23:18 IST2015-02-09T23:18:19+5:302015-02-09T23:18:19+5:30
‘सर्वांसाठी पाणी व टंचाईमधून गावांची मुक्ती’ या जलयुक्त शिवार कार्यक्रमातून पाणीटंचाई कायम हद्दपार करण्याचे उद्दीष्ट आहे़ यात जिल्ह्यातील २१४ गावांचा समावेश करण्यात आला

पाणी टंचाईवर मात करण्यासाठी २१४ गावांचा बृहत आराखडा
वर्धा : ‘सर्वांसाठी पाणी व टंचाईमधून गावांची मुक्ती’ या जलयुक्त शिवार कार्यक्रमातून पाणीटंचाई कायम हद्दपार करण्याचे उद्दीष्ट आहे़ यात जिल्ह्यातील २१४ गावांचा समावेश करण्यात आला असून बृहत आराखडा तयार केला जात आहे़
जलयुक्त शिवार कार्यक्रमाच्या पहिल्या टप्प्यात २१४ गावांचा समावेश आहे़ यात गावातील नद्या, नाले, विहिरींचा अभ्यास करून पावसाचे पाणी अडविण्यासाठी करावयाच्या उपाययोजना पूर्वी अस्तित्वात असलेल्या जलसंवर्धन बंधाऱ्यांची दुरूस्ती, खोलीकरण करण्यास प्राधान्य राहणार आहे़ प्रत्येक गाव पाण्यासाठी स्वयंपूर्ण व्हावे, ही कल्पना आहे़ पावसाचे पाणी अडविण्यासह गावात उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करणे, पिण्यासाठी जनावरांसाठी तसेच शेतीसाठी लागणाऱ्या पाण्यांचे या योजनेंतर्गत वाटर बजेट तयार केले जाणार आहे. यासाठी प्रथम बृहत आराखडा तयार करण्यात येत आहे. या यात लोकसहभागही महत्त्वाचा राहणार आहे़(कार्यालय प्रतिनिधी)